उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा शनिवारी वाढदिवस झाला. अनेक जण त्यांना शुभेच्छा देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र शुभेच्छांचे ट्विट केले नाही. त्यामुळे अनेक पंचमस्तंभियांनी पंतप्रधान योगींवर नाराज असल्याचे बोलायला सुरूवात केली. मात्र, पंतप्रधानांनी ट्विट करून शुभेच्छा देण्यापेक्षा प्रत्यक्ष फोनवर बोलून योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस साजरा केला आहे. So Prime Minister Narendra Modi did not congratulate Yogi Adityanath on Twitter
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा शनिवारी वाढदिवस झाला. अनेक जण त्यांना शुभेच्छा देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र शुभेच्छांचे ट्विट केले नाही. त्यामुळे अनेक पंचमस्तंभियांनी पंतप्रधान योगींवर नाराज असल्याचे बोलायला सुरूवात केली. मात्र, पंतप्रधानांनी ट्विट करून शुभेच्छा देण्यापेक्षा प्रत्यक्ष फोनवर बोलून योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस साजरा केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी आपल्या सरकारमधील मंत्री, पक्षाचे नेते, विरोधी पक्षातील नेते यांना त्यांच्या वाढदिवशी ट्विटरवरून शुभेच्छा देतात. परंतु योगी आदित्यनाथ यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यामुळचे राजकीय वतुर्ळात चर्चा सुरू झाली होती. काहींनी तर याचा संबंध भारतीय जनता पक्ष संघटनेत कुरबुर सुरू असल्यापर्यंत जोडला.
काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथांच्या मंत्रीमंडळात फेरबदल होण्याची चर्चा सुरू होती. त्याचा संबंधही याच्याशी जोडला गेला. भाजपाचे सरचिटणिस (संघटन) बीएल संतोष आणि लखनौ येथील मंत्री, पक्षाचे नेते यांच्यात झालेल्या बैठका, कोरोनाचे संकट यामुळे योगींबाबतची नाराजी असल्याचे बोलले जाऊ लागले.
मात्र, वास्तव वेगळेच आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यावर मृतांचा आकडाही वाढला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून कोणत्याही नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. १८ मे रोजी केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत, २४ मे रोजी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, ५ मे रोजी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, ३ मे रोजी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, २७ मे रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही वाढदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या नाहीत. मात्र, पंतप्रधानांनी योगींशी फोनवरून संपर्क साधला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App