बॉलीवुडमधील वादग्रस्त व्यक्तीमत्व अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खानने आता संपूर्ण बॉलीवुडलाच धमकी दिली आहे. ज्येष्ठ चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्यासारखा देश सोडून जाईल पण त्यापूर्वी बॉलीवुडमधील अनेकांची चड्डीच उतरवेल अशी धमकी त्याने दिली आहे.I will leave country like MF Hussain, but will take off Bollywood’s cloths, threatens Kamal R Khan
विशेष प्रतिनिधी
मुंबई: बॉलीवुडमधील वादग्रस्त व्यक्तीमत्व अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खानने आता संपूर्ण बॉलीवुडलाच धमकी दिली आहे. ज्येष्ठ चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्यासारखा देश सोडून जाईल पण त्यापूर्वी बॉलीवुडमधील अनेकांची चड्डीच उतरवेल अशी धमकी त्याने दिली आहे.
कमाल आर खान हा केआरके नावाने प्रसिध्द आहे. सलमान खान याच्या राधे चित्रपटानंतर त्याने केलेल्या टिकेमुळे त्यांच्या वाद झाला होता. त्यानंतर कमाल खान याने आरोप केला आहे
की आता बॉलीवुडच्या लोकांकडून त्याचा छळ होत आहे. त्याच्यावर कायदेशिर कारवाई करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. या कारवाईपासून वाचण्यासाठी कदाचित तो परदेशात कायमस्वरुपी जाऊ शकतो.
मात्र, आपल्याला जास्त त्रास देऊ नका असे सांगताना कमाल खान म्हणाला, माझ्याकडे अनेकांची रहस्ये आहेत. अनेक व्हिडीओ आहेत. ते जर मी सार्वजनिक केले तर अनेकांची चड्डीच उतरली जाईल.
कमाल खान याने राधे चित्रपटाबाबत अत्यंत वाईट परीक्षण लिहिले होते. त्यामुळे सलमानसोबत त्याचा चांगलाच वाद झाला होता. यावरून कमाल खान म्हणाला, मी चित्रपटांचे परीक्षण बंद करण्याचे ठरविले होते.
कारण मला वाटत होते की माझे आता वय राहिले नाही. ज्या पध्दतीने बॉलीवुडमध्ये माझा छळ होत आहे ते पाहून वाटतेय की मला एम. एफ हुसेन यांच्यासारखेच देश सोडून जावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App