भारतात करोनाबाधितांची संख्या वाढल्यानंतर लस निर्यात थांबवण्यात आली होती. भारताने लस निर्यात थांबवण्याचा फटका गरीब, विकसनशील आणि शेजारच्या देशांनाही बसला आहे. भारताकडून कोविशील्ड लस न मिळाल्यामुळे या देशांनी चीनकडे धाव घेतली. मात्र, चीनने त्यांची लूट सुरू केली असून लशीसाठी अधिक रक्कम वसूल करण्यास सुरुवात केली आहे.Sri Lanka, Bangladesh looted from China due to suspension of vaccine exports by India
विशेष प्रतिनिधी
ढाका/कोलंबो: भारतात करोनाबाधितांची संख्या वाढल्यानंतर लस निर्यात थांबवण्यात आली होती. भारताने लस निर्यात थांबवण्याचा फटका गरीब, विकसनशील आणि शेजारच्या देशांनाही बसला आहे.
भारताकडून कोविशील्ड लस न मिळाल्यामुळे या देशांनी चीनकडे धाव घेतली. मात्र, चीनने त्यांची लूट सुरू केली असून लशीसाठी अधिक रक्कम वसूल करण्यास सुरुवात केली आहे.
भारताच्या कोविशील्डच्या एका डोससाठी ५.५ डॉलर मोजावे लागतात. चीनच्या सिनोफार्म लशीच्या एका डोससाठी १५ डॉलर मोजावे लागत आहेत. त्याशिवाय चीनने दक्षिण आशियातील देशांसाठी वेगवेगळे लस दर ठरवले आहेत.
बांगलादेशला एक डोससाठी १० डॉलर, तर श्रीलंकेला सिनोफार्मच्या एका लशीच्या डोससाठी १५ डॉलर मोजावे लागत आहेत. बांगलादेशमधील वृत्तपत्र ‘द डेली स्टार’ ने म्हटले की, बांगलादेश सिनोफार्मकडून १.५ कोटी डोस खरेदी करणार आहे.
लस डोस खरेदीसाठी कॅबिनेट समितीने त्याला मंजुरी दिली आहे. अर्थमंत्री एएचएम मुस्तफा कमाल यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीनंतर एका अधिकाºयाने लशीचा एक डोस १० डॉलरला खरेदी करत असल्याचे म्हटले.
बांगलादेशमध्ये लशीच्या डोसची किंमत समोर आल्यानंतर श्रीलंकेतही यावरून जोरदार चर्चा सुरू झाल्या. श्रीलंका सरकारला सिनोफार्मच्या लशीसाठी १५ डॉलर मोजावे लागत आहेत. बांगलादेशमध्येही लस किंमतीच्या मुद्यावरून वातावरण गरम झाले आहे.
अर्थ मंत्रालयाने पत्रकारांना लशीची किंमत सार्वजनिक न करण्याची विनंती केली. बांगलादेशचे आरोग्य मंत्री जाहिद मालेक यांनी लशीची किंमत जाहीर करण्यात आली नसल्याचे म्हटले.
श्रीलंकन वृत्तपत्र डेली मिररने औषध उत्पादन, पुरवठा आणि नियमन राज्यमंत्री प्रा. चन्ना जयसुमना यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार श्रीलंका आणि बांगलादेशला १० डॉलर दराने लस विक्री करण्याबाबत कोणताही करार करण्यात आला नाही.
श्रीलंकेने आतापर्यंत खरेदी केलेल्या लशींच्या किंमतींची तुलना करताना वृत्तपत्राने म्हटले की, चीनच्या सिनोफार्म लशीचे दोन कोटी डोस पुढील महिन्यात श्रीलंकेत दाखल होण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेने प्रत्येकी एक डोस १५ डॉलर्सवर विकत घेतली आहे. मात्र, श्रीलंकेने भारताकडून ५.५ डॉलर किंमतीला कोविशील्ड लशीचा एक डोस खरेदी केला आहे.
श्रीलंकेच्या सरकारलाही या लसीच्या किंमतींबाबत वादाला तोंड द्यावे लागणार आहे. श्रीलंकेच्या आरोग्य सेवा महासंचालक डॉ. असेला गुणवर्धने यांनी सरकारचा बचाव करताना म्हटले आहे की, देशाला सर्वात कमी किंमतीवर सिनोफॉर्म लस मिळाली आहे.
या लशीची किंमत १८ ते ४० डॉलर दरम्यान आहे. किंमती काही परिस्थितीत बदलू शकतात. माध्यमांमध्ये लस किंमतीच्या विषयावर चर्चा सुरू झाल्यानंतर दोन्ही देशांतील सोशल मीडियावर सरकारवर टीका होऊ लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App