वृत्तसंस्था
पुणे : पुणे शहरातील सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत तर शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने याच वेळेत सुरु राहतील, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. All Shops In Pune Will Be Open From 7 Am To 2 Pm From Tomorrow : Mayer Muralidhar mohol
पुणे शहरातील निर्बंधांची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाउनचे निर्बंध १५ जूनपर्यंत कायम ठेवण्याची घोषणा केली. तसेच स्थानिक प्रशासनाला रुग्णसंख्येनुसार निर्बंध कमी,
जास्त करण्याचे अधिकार दिले आहेत. त्या नुसार महापौर यांनी निर्बंधाबाबत माहिती दिली.याशिवाय, उद्याने, व्यामशाळा (जिम), हॉटेल बंद राहणार असून, पार्सलसेवा सुरू राहणार आहे.
पुढील दहा दिवसांसाठी हा आदेश असणार आहे. आता दोन वाजेपर्यंत नागरिकांच्या दृष्टीने सर्व सेवा सुरू राहणार आहेत. पण, त्यानंतर नागरिकांनी बाहेर पडू नये. पीएमपी बस सेवा अत्यावश्यक सेवेत काम करणार्यांसाठी सुरू राहणार आहे, इतर नागरिकांना त्याद्वारे प्रवास करता येणार नाही, अशी माहिती मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निर्बंधात काय सवलत…
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App