आता देवच तुम्हाला वाचवेल, मेघालय सरकार कोरोनासमोर हतबल ; प्रार्थना करण्याचे आवाहन

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : “माणूस स्वत:ला वाचवू शकणार नाही, आता आपल्याला देवाच्या मदतीची गरज”; असे विधान मेघालयाचे आरोग्यमंत्री अलेक्झांडर लालू हेक यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे ते आणि सरकार हतबल झाल्याचे स्पष्ट होत आहे. corona case increased in meghalaya then the government said pray to god

मेघालयमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. या महिन्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत जवळपास पाचपट वाढ झाली आहे. कोरोनासमोर तिथलं सरकार हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.



मेघालयचे आरोग्यमंत्री अलेक्झांडर लालू हेक यांनी एक विधान केलं आहे.” माणूस स्वत:ला वाचवू शकणार नाही, आता आपल्याला देवाच्या मदतीची आणि आशीर्वादाची गरज आहे, देवाशिवाय आपण कुणीच नाही” असं म्हटलं आहे. तसेच 30 मे रोजी दुपारी 12 वाजता सर्वांनी घरी आपापल्या ईश्वराची प्रार्थना करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. मेघालय सरकारनं त्यासंदर्भात परिपत्रकच काढलं आहे. दरम्यान, मेघालयमध्ये शनिवारी 24 तासांत कोरोनाचे 731 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

corona case increased in meghalaya then the government said pray to god

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात