अयोध्येतील मशीद उभारणीसाठीची देणग्यांवर करसवलत , इंडो- इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनच्या मागणीनंतर सरकारचा निर्णय

अयोध्येत उभारल्य जात असलेल्या मशीदीसाठी दिल्या जाणाऱ्या देणग्यांवर आता करसवलत मिळणार आहे. इंडो- इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनच्या मागणीनंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.Govt decides on tax exemption on donations for mosque construction in Ayodhya, following demand of Indo-Islamic Cultural Foundation


विशेष प्रतिनिधी

अयोध्या : अयोध्येत उभारल्य जात असलेल्या मशीदीसाठी दिल्या जाणाऱ्या देणग्यांवर आता करसवलत मिळणार आहे. इंडो- इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनच्या मागणीनंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.

गेल्या 25 वर्षांपासून सुरू असलेल्या बाबरी मशीद प्रकरणाचा तिढा आता सुटला आहे. अयोध्येत बाबरी मशीदीच्या ठिकाणी आता भव्य दिव्य राम मंदिर उभारलं जाणार आहे. य्बाबरी प्रकरणात निकाल देताना,



न्यायालयानं मुस्लिम समुदायालाही काही जमीन देवू केली होती. ती जमीन बाबरी मशीदीपासून काही अंतरावरच आहे. त्याठिकाणी उभारण्यात येणाºया मशीदीचे कामही सुरू झाले आहे.

इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनचे अध्यक्ष जफर फारुखी म्हणाले, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मशीदीवर दिल्या जाणाºया देणग्यांसाठी ८० जी अंतर्गत प्राप्ती कराची सवलत मिळावी अशी मागणी केलीहोती. २१ जानेवारी रोजी ही मागणी फेटाळली होती.

त्यानंतर ३ फेब्रुवारीला पुन्हा अर्ज केला. त्याबाबतच्या शंकाना १० मार्चला उत्तरे दिली होती. त्याप्रमाणे आता करसवलत मिळाली आहे. मात्र, आत्तापर्यंत ही सवलत नसल्याने देणग्या मिळत नव्हत्या. केवळ २० लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या.

ही मशीद जगातील निवडक मशिदींपैकी एक असेल. तसेच मशीद सौंदयार्चा आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असेल. या मशिदीचं डिझाईन आणि आर्किटेक्ट आज लाँच करण्यात आलं आहे. या मशिदीच्या डिझाइनमध्ये ग्रंथालय आणि रुग्णालयही असणार आहे.

इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन तयार करत असलेल्या या मशिदीचं वैशिष्ट्यं म्हणजे त्याची रचना होय. मधोमध गोल घुमट असलेली ही मशिद खूपच आकर्षक असेल. तसेच चित्रात दिसत

असलेल्या चकोर परिसरात एक संग्रहालय, रुग्णालय, ग्रंथालय आणि कम्युनिटी किचन बांधलं जाणार आहे.ही गोल मशिद पारंपारिक मशिदींपेक्षा वेगळी असेल आणि यामध्ये आधुनिक कलेचा जास्तीत जास्त वापर केला जाणार आहे.

Govt decides on tax exemption on donations for mosque construction in Ayodhya, following demand of Indo-Islamic Cultural Foundation

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात