अयोध्येतील राम मंदिर बनणार आणखी भव्य, राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टने खरेदी केली १.१५ लाख चौरस फुट जमीन

अयोध्येतील राम मंदिर आणखी भव्य बनणार आहे. राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टने अयोध्येतील १.१५ लाख चौरस फुट जमीन खरेदी केली आहे. त्यामुळे राम मंदिर ७० एकर जागेतून विस्तारून आता १०८ एकर क्षेत्रात उभारले जाणार आहे.


विशेष प्रतिनिधी

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर आणखी भव्य बनणार आहे. राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टने अयोध्येतील १.१५ लाख चौरस फुट जमीन खरेदी केली आहे. त्यामुळे राम मंदिर ७० एकर जागेतून विस्तारून आता १०८ एकर क्षेत्रात उभारले जाणार आहे.In Ayodhya 1.15 lakh square feet land purchased by Ram Mandir Trust

राम कोट आणि टिहरी बाजार परिसरातील दोन भूखंड ट्रस्टने विकत घेतल्याचे ट्रस्टी अनिल मिश्रा यांनी सांगितले. बस्ती जिल्ह्यातील हरीशकुमार पाठक यांची ही जमीन आहे. ६९० रुपये चौरस फुट दराने पाठक यांना आठ कोटी रुपयेही देण्यात आले आहे. या जमीनीचा वापर भक्तांना विविध सोई-सुविधा पुरविण्याबरोबरच सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठीही होणार आहे.राम मंदिराचा विस्तार करण्यासाठी राम जन्मभूमी परिसराला लागून असलेल्या मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यांची यादीही बनविण्याचे काम सुरू आहे. त्यातील काही मालमत्ता या मुस्लिम नागरिक आणि मशीदींच्या मालकीच्या आहे. अयोध्येचे महापौर ऋषीकेश उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार या मालमत्तांच्या मालकांचा शोध सुरू आहे.

राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टेचे सचिव चंपत राय यांनी सांगितलेकी राम मंदिर परिसराचा विस्तार हा परस्पर संवादातून होणारआहे. मालमत्ताधारक त्या किंमतीत जमीन विकत घेतली जाईल. एखाद्याने मागणी केल्यास त्या बदल्यात दुसरी जमीन दिली जाईल,

मार्चच्य पहिल्या आठवड्यात रामजन्मभूमी परिसराला लागून असलेली ७२६५ चौरस फुट जमीन एक कोटी रुपये देऊन खरेदी करण्यात आली होती. त्यामुळे मंदिराचा विस्तार ७० एकरांहून १०७ एकरांपर्यंत वाढणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राम मंदिर उभारणीसाठी ७० एकर जमीन देण्यात आली होती.

नव्याने खरेदी केलेल्या जमीनीमुळे विस्तार वाढणार आहे. त्याचबरोबर या परिसराला लागून असलेली मंदिरे,घरांची आणि मोकळी जागाही त्यांच्या मालकांशी बोलणी करून खरेदी करण्याची योजना बनविण्यात आली आहे.

मुख्य मंदिराची उभारणी ही पाच एकर जागेत होणार आहे. उर्वरित जमीनीवर संग्रहालय, पुस्तकालय, यज्ञशाळा आणि भगवान राम यांच्या जीवनातील विविध घटना मांडणारी आर्ट गॅलरी उभारली जाणार आहे.

In Ayodhya 1.15 lakh square feet land purchased by Ram Mandir Trust

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*