विशेष प्रतिनिधी
पुणे – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे यांनी राज्यातील विविध पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला आज प्रकाश आंबेडकरांच्या भेटीने संपविला. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रात संभाजीराजे – प्रकाश आंबेडकर अशा नव्या आघाडीचे सूतोवाच केले. MP Sambhaji Raje and Prakash Ambedkar try to evolve new political front in Maharashtra
संभाजीराजे सध्या राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभा सदस्य आहेत. ते सध्या भाजपशी संलग्न आहेत. पण भाजपशी काही देणे घेणे नाही, असे वक्तव्य त्यांनी नुकतेच केले होते. ते कोणाच्या प्रेरणेतून होते, याची राज्यात चर्चा चालू असतानाच त्यांनी आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. आपल्याला छत्रपती शाहू महाराजांचा वारसा आहे. प्रकाश आंबेडकरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. हे दोन्ही नेते एकत्र होते. आम्हीही एकत्र येऊ शकतो, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांनीही यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले. ते म्हणाले, की “शरद पवारांचे राजकारण मी गेल्या ४० वर्षांपासून जवळून पाहत आलोय. ते नरो वा आणि कुंजरो वा या भूमिकेत कायम असतात. म्हणजे त्यांची भूमिका कायम संशयास्पद असते. पण शरद पवार हे लवकरच आरक्षणाबाबत भूमिका घेतील. मराठा आरक्षणासाठी आता दोनच संवैधानिक मार्ग आहेत. एक म्हणजे कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणे, आणि दुसरा म्हणजे ही याचिका फेटाळली तर दुसरी याचिका दाखल करणे. पण राजसत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिळेपणा आला आहे. राजकारणात ताजेपणा येण्याची गरज आहे. संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर हा ताजेपणा येईल. मी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासाठी अस्पृश्य आहे. माझी इच्छा नसतानाही ते मला भाजपकडे ढकलत आहेत. पण मला त्यांच्याकडे जायचे नाही. मात्र, मी संभाजीराजेंबरोबर जायला तयार आहे, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी मांडली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App