मराठा आरक्षणासाठी ठोस कृती केली नाही तर रायगडावरून ६ जूनला आंदोलनाची घोषणा,ओबीसींमध्ये नवा प्रवर्ग शक्य आहे का सांगा, खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा इशारा;


मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. ठोस कृती केली नाही तर रायगडावरून ६ जूनला आंदोलनाची घोषणा करणार आहे. कोरोना बिरोना काही पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.If no concrete action is taken for Maratha reservation, agitation will be announced from Raigad on June 6, tell me if a new category is possible in OBCs, warning of MP Sambhaji Raje Chhatrapati;


प्रतिनिधी

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. ठोस कृती केली नाही तर रायगडावरून ६ जूनला आंदोलनाची घोषणा करणार आहे. कोरोना बिरोना काही पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देण्याची भूमिका अनेकांनी मांडली आहे; पण ओबीसींमध्ये नवे प्रवर्ग करणे शक्य आहे का? हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनीच सांगायला हवे.आता या सर्वांनी याबाबतची भूमिका स्पष्ट करायला हवी, असेही त्यांनी म्हटले आहे.सकल मराठा समाजाच्या वतीने संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला तीन पर्याय सुचविले आहेत. आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत मराठा समाजाच्या विकासासाठी पाच मागण्या त्यांनी सरकारसमोर ठेवल्या आहेत.

पर्याय आणि मागण्यांवर येत्या ६ जूनपूर्वी या मागण्यांवर ठोस कार्यवाही करावी, अन्यथा शिवराज्याभिषेकदिनी किल्ले रायगडावरून आंदोलनाची हाक देऊ. कोरोना वगैरे काही पाहणार नाही, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्यानंतर संभाजीराजे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. शुक्रवारी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी उपस्थित होते. यानंतर मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत त्यांनी आपली पुढील भूमिका मांडली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा समाजामध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे तातडीने मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघायला हवा. मात्र, राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.

तुमच्या या राजकीय भांडणाशी आमचे देणे-घेणे नाही. समाजाला न्याय मिळवून द्या, अशी विनंती संभाजीराजे यांनी केली आहे.संभाजीराजे म्हणाले, मराठा समाजाने ५८ मुक मोर्चांच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

त्यामुळे आता आंदोलन करून समाजाला वेठीस धरण्याची गरज नाही. आता आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींना घेऊन संघर्ष करावा लागेल. सकल मराठा समाजातील तज्ज्ञांशी चर्चा करून आरक्षणासाठी तीन पर्याय सुचवीत आहे. पाच मागण्यांचे निवेदन सरकारला दिले आहे.

राज्य सरकारने आता सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी. केवळ लोकांना दाखविण्यासाठी नाही तर पूर्ण तयारीनिशी अशी याचिका असायला हवी. पुनर्विचार याचिका टिकली नाही तर शेवटचा पर्याय म्हणून राज्य सरकारने क्युरिटीव्ह पिटिशन करावे.

हा पर्याय कठीण आणि शेवटचा पर्याय आहे. त्यासाठी खूप तयारी करावी लागेल. वरील दोन्ही पर्याय राज्य सरकारच्या अधिकारात असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

राज्य सरकार ३४२ (अ) अंतर्गतआपला प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवू शकतो. हा प्रस्ताव राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडे जातो. राष्ट्रपतींना योग्य वाटल्यास ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे प्रस्ताव पाठवितात. तिथून योग्य ठरल्यास हा प्रस्ताव मान्यतेसाठी संसदेकडे पाठविला जातो.

हा प्रस्ताव राज्यपालामार्फत पाठविला जातो; पण केवळ राज्यपालांना भेटून किंवा पत्र देऊन चालत नाही, तर गायकवाड आयोगाच्या अहवालातील त्रुटी दूर करून, आवश्यक तो सर्व डाटा गोळा करून पूर्ण तयारीने प्रस्ताव पाठवावा लागतो, असा तिसरा पर्याय त्यांनी सांगितला आहे.

मराठा आक्षणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी मागण्याही संभाजीराजे यांनी केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानेच आपल्या निकालात ९ सप्टेंबर २०२० पूर्वीच्या नियुक्त्या कायम केल्या आहेत. जवळपास २१८५ उमेदवार आहेत.

तरीही भोसले अहवालाचे कारण पुढे करत या उमेदवारांना शासकीय सेवेत घेतले जात नाही. सर्वोच्च न्यायालयाने एकदा निकाल दिल्यावरही या उमेदवारांच्या आयुष्याशी का खेळताय, असा प्रश्न करतानाच तातडीने या उमदेवारांना सेवेत सामावून घ्यावे.

छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने सुरू केलेली सारथी संस्था नीट चालविल्यास आरक्षणापेक्षा अधिक चांगला लाभ यातून मिळेल; पण आज त्याची दुरवस्था झाली आहे. या संस्थेला स्वायत्तता द्यावी. समाजासाठी तळागाळात काम करणाऱ्या चांगल्या लोकांना संस्थेवर घ्यावे.

सध्या ज्यांचा संबंध नाही असे नऊ सनदी अधिकारी तिथे नेमले आहेत. तसेच, किमान एक हजार कोटींच्या निधीची घोषणा करावी. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सक्षम करावे. प्रत्येक जिल्ह्यात समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारावे.

अनेक जिल्ह्यांत केवळ घोषणा झाली; पण पुढे काही नाही. यावर तातडीने काम व्हायला हवे. ओबीसींप्रमाणे मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणात सवलत मिळायला हवी, अशा मागण्या संभाजीराजे यांनी केल्या आहेत.

बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवा पक्षही स्थापन करू; पण आता तो विषय नाही. सध्या मराठा आरक्षणाचा तिढा सुटणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

If no concrete action is taken for Maratha reservation, agitation will be announced from Raigad on June 6, tell me if a new category is possible in OBCs, warning of MP Sambhaji Raje Chhatrapati;

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण