भारतात ८० कोटी जनतेला मोफत अन्न तरीही जगभर प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न – जयशंकर

विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : भारत सरकारबद्दल चुकीची प्रतिमा निर्माण करण्यासाठी ‘राजकीय प्रयत्न’ सुरु असून जगभरात सांगितली जाणारी भारतातील राजकीय स्थिती आणि प्रत्यक्ष स्थिती यात मोठा फरक असल्याचा दावा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केला आहे. Indian govt. gives free food grains to 80 core people

अमेरिका दौऱ्यावर असलेले जयशंकर म्हणाले,‘‘आम्ही सध्या ८० कोटी जनतेला मोफत अन्न देत आहोत. गेल्या वर्षी अनेक महिने हे काम केले आणि आता दुसऱ्या लाटेतही ती मोहिम राबविली जात आहे. आम्ही ४० कोटी लोकांच्या बँक खात्यांमध्ये पैसे भरले.



हे भारत सरकार करत आहे. हे करताना कोणताही दूजाभाव बाळगला जात नाही. या वास्तवाकडे पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की, जगभरात निर्माण केली गेलेली भारताची राजकीय प्रतिमा आणि प्रत्यक्षातील स्थिती यामध्ये बरेच अंतर आहे.

दहशतवाद किंवा त्याचा राजकीय अस्त्र म्हणून होणारा वापर भारताला कदापिही मान्य नाही, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. भारत आणि पाकिस्तानात सध्या शस्त्रसंधीचे काटेकोर पालन होत असले तरी त्याहूनही अधिक महत्त्वाचे प्रश्न सोडविणे आवश्यकक आहे, असे ते म्हणाले.

Indian govt. gives free food grains to 80 core people

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात