वृत्तसंस्था
पुणे : पुणे, पिंपरी महापालिकेने आणि पीएमआरडीएने नदीपात्रातील अतिक्रमणे त्वरित हटवावीत , असे आदेश जलसंपदा विभागाने दिले आहेत. Water Resources Department Order To Remove River Basin Encroachments
मुठा, मुळा, पवना, इंद्रायणी आदी नद्यांच्या पात्रातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि पूररेषांमध्ये टाकलेला राडारोडा, मुरूम, माती टाकली आहे. आता ती काढावी, असे आदेश दिले आहेत.
नद्यांच्या पात्रामध्ये अनधिकृत बांधकामे तसेच पूररेषांमध्ये राडारोडा, मुरूम, माती टाकली आहे. त्यामुळे नद्यांच्या पूर वहनास अडथळा येऊ नये, यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करावी, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करून योग्य त्या उपयायोजना कराव्यात, असेही या आदेशात नमूद केले आहे.
पर्यावरणप्रेमी सारंग यादवाडकर यांनी पुणे महापालिका आणि अन्य शासकीय यंत्रणांविरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान एनजीटीने एक संयुक्त समिती स्थापन केली होती. या संयुक्त समितीच्या सदस्यांनी मुठा, मुळा, पवना आणि इंद्रायणी आदी नद्यांच्या पात्रामध्ये झालेल्या अतिक्रमणांची पाहणी केली. तसेच अहवालही एनजीटीला सादर केला होता. त्यानुसार राज्याच्या जलसंपदा विभागाने हे आदेश दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App