BSE Market Cap Touches 3 Trillion Dollar : आज शेअर बाजाराने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. इतिहासात पहिल्यांदाच BSE लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपने 3 ट्रिलियन डॉलरच्या पातळीला ओलांडले आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स 111 अंकांच्या तेजीसोबत 50,652 च्या पातळीवर आणि निफ्टी 22 अंकांच्या तेजीसोबत 15197 च्या पातळीवर बंद झाले. BSE लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज 218.94 लाख कोटीच्या पातळीवर बंद झाला जो व्यवहारादरम्यान एकदा 219 लाख कोटींच्या पातळीवरही पोहोचला होता. Share Market BSE Market Cap Touches 3 Trillion Dollar Doubled IN Just 7 Years
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज शेअर बाजाराने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. इतिहासात पहिल्यांदाच BSE लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपने 3 ट्रिलियन डॉलरच्या पातळीला ओलांडले आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स 111 अंकांच्या तेजीसोबत 50,652 च्या पातळीवर आणि निफ्टी 22 अंकांच्या तेजीसोबत 15197 च्या पातळीवर बंद झाले. BSE लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज 218.94 लाख कोटीच्या पातळीवर बंद झाला जो व्यवहारादरम्यान एकदा 219 लाख कोटींच्या पातळीवरही पोहोचला होता.
Market capitalization of equities of listed companies on @bseindia reached USD 3 trillion intra day for the first time ever. A great milestone on a long journey. Congratulations to all 6.9 crore+ registered investors, 1400+ brokers,69,000+ MF distributors and 4700 + companies. — Ashish Chauhan (@ashishchauhan) May 24, 2021
Market capitalization of equities of listed companies on @bseindia reached USD 3 trillion intra day for the first time ever. A great milestone on a long journey. Congratulations to all 6.9 crore+ registered investors, 1400+ brokers,69,000+ MF distributors and 4700 + companies.
— Ashish Chauhan (@ashishchauhan) May 24, 2021
BSEचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ आशिष कुमार चौहान यांनी ट्वीट करून या ऐतिहासिक क्षणाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, आज इंट्रा डेदरम्यान पहिल्यांदा मार्केट कॅप 3 ट्रिलियन डॉलरच्या पातळीवर पोहोचला. यासाठी देशातील 6.9 कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदार, 1400 हून जास्त ब्रोकर्स, 69 हजारांहून जास्त म्यूच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर आणि 4700 कंपन्यांचे त्यांनी आभार मानले. मागच्या दोन दिवसांत तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.30 लाख कोटींची वाढ झाली आहे.
सात वर्षांपूर्वी 28 नोव्हेंबर 2014 रोजी BSE लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपने 100 लाख कोटींचा आकडा पार केला होता. आज सेंसेक्सवर एसबीआय, एल अँड टी, अॅक्सिस बँक, पॉवर ग्रीड, आयटीसी आणि मारुतीचे समभाग टॉप गेनर्स राहिले. दुसरीकडे, टायटन, इंडसइंड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि अल्ट्राटेक सीमेंटचे समभाग टॉप लूजर्स राहिले.
मार्च 2002 : 125 बिलियन डॉलर ऑगस्ट 2005 : 500 बिलियन डॉलर 28 मे 2007 : 1 ट्रिलियन डॉलर 6 जून 2014 : 1.5 ट्रिलियन डॉलर 10 जुलै 2017 : 2 ट्रिलियन डॉलर 16 डिसेंबर 2020 : 2.5 ट्रिलियन डॉलर 24 मे 2021 : 3 ट्रिलियन डॉलर (159 दिवसांत)
@bseindia timeline for market capUS$ 125 billion: March 2002US$ 500 billion: Aug 2005US$ 1 trillion: 28 May 2007US$ 1.5 trillion: 6 June 2014 (2566 Days)US$ 2 trillion: 10 July 2017 (1130 Days)US$ 2.5 trillion: 16 Dec 2020 (1255 Days)US$ 3 trillion: 24 May 2021 (159 Days) — Ashish Chauhan (@ashishchauhan) May 24, 2021
@bseindia timeline for market capUS$ 125 billion: March 2002US$ 500 billion: Aug 2005US$ 1 trillion: 28 May 2007US$ 1.5 trillion: 6 June 2014 (2566 Days)US$ 2 trillion: 10 July 2017 (1130 Days)US$ 2.5 trillion: 16 Dec 2020 (1255 Days)US$ 3 trillion: 24 May 2021 (159 Days)
BSEचे सीईओ म्हणाले की, एक आणखी आकडेवारी शेअर केली आहे. यानुसार मार्च 2002 मध्ये BSE लिस्टेड सर्व कंपन्यांचे मार्केट कॅप 125 बिलियन डॉलर होते. ऑगस्ट 2005 मध्ये ते 500 बिलियन डॉलर झाले होते. 28 मे 2007 रोजी ते 1 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले. 6 जून 2014 रोजी हे 1.5 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले. 10 जुलै 2017 रोजी 2 ट्रिलियन डॉलर, 16 दिसंबर 2020 को रोजी 2.5 ट्रिलियन डॉलर आणि 24 मे 2021 रोजी हे 3 ट्रिलियन डॉलरच्या पातळीवर पोहोचले.
Share Market BSE Market Cap Touches 3 Trillion Dollar Doubled IN Just 7 Years
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App