मुंबईत आमदाराच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न, पुलावरून उडी मारणार तेवढ्यात…

MLA Wife Attempts Suicide on Mankhurd Bridge, Saved By Traffic Police

MLA Wife Attempts Suicide : वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे आत्महत्या करायला गेलेल्या एका महिलेचे प्राण वाचले आहेत. शनिवारी सकाळी वाहतूक पोलिसांच्या हवालदाराने आत्महत्या करणार्‍या महिलेला वेळेवर रोखले. या महिलेची चौकशी केली असता त्यांनी एका आमदाराची पत्नी असल्याचे सांगितले आहे. ही घटना उघडकीस येताच घटनास्थळी उपस्थित लोकांमध्ये खळबळ उडाली होती. पोलीस संबंधित महिलेची चौकशी करत आहेत. MLA Wife Attempts Suicide on Mankhurd Bridge, Saved By Traffic Police


विशेष प्रतिनिधी

मुंबई : वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे आत्महत्या करायला गेलेल्या एका महिलेचे प्राण वाचले आहेत. शनिवारी सकाळी वाहतूक पोलिसांच्या हवालदाराने आत्महत्या करणार्‍या महिलेला वेळेवर रोखले. या महिलेची चौकशी केली असता त्यांनी एका आमदाराची पत्नी असल्याचे सांगितले आहे. ही घटना उघडकीस येताच घटनास्थळी उपस्थित लोकांमध्ये खळबळ उडाली होती. पोलीस संबंधित महिलेची चौकशी करत आहेत.

सकाळी 10.15च्या सुमारास मानखुर्द परिसरातील वाहतूक पोलिसांचे पथक प्रवाशांना नेहमीप्रमाणे निर्देश देत होते. तेवढ्या एका बाईकस्वाराने त्यांना सूचना दिली की, जवळच मानखुर्द पुलाच्या ग्रिलवर एक महिला बसली असून ती निराश असल्याचे दिसून येत आहे. ही माहिती मिळताच वाहतूक पोलीस हवालदार ढगे यांनी तत्परतेने घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान, त्याच्या सहकाऱ्यांनी कंट्रोल रूम, मानखुर्द पोलीस स्टेशन आणि नवी मुंबई पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांमुळे वाचले महिलेचे प्राण

कॉन्स्टेबल ढगे यांनी पुलाजवळ येऊन कसेतरी त्या महिलेला ग्रीलमधून खाली येण्यास भाग पाडले. यानंतर त्यांना मानखुर्द पोलीस ठाण्यात आणण्यात आले. महिलेकडून आत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण जाणून घेण्यास सुरुवात केली तेव्हा तिने सांगितले की ती एका आमदाराची पत्नी आहे.

कौटुंबिक कलहामुळे करणार होती आत्महत्या

कौटुंबिक कलहामुळे निराश झाल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. त्यानंतर या महिलेला नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई पोलिसांनी या महिलेच्या कुटुंबाशी संपर्क साधून त्यांना सर्व घटनेची माहिती दिली आहे.

MLA Wife Attempts Suicide on Mankhurd Bridge, Saved By Traffic Police

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात