वृत्तसंस्था
पणजी : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. यापूर्वी परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. 10th exam canceled in Goa
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आणि लॉकडाऊन करूनही रुग्णसंख्या नियंत्रणात येत नाही. अशा पार्श्वभूमीवर परीक्षा घेऊन मुलांना संकटात टाकणे अयोग्य ठरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून परीक्षा रद्द केल्या आहेत.
दहावीचा निर्णय सरकारने घेतला. आता बारावी परिक्षेबाबत लवकरच म्हणजे बुधवरपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत गुणांवर पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल. अंतर्गत गुण कमी असल्यास आणि एखाद, दुसरा विषय राहात असल्यास ‘एटीकेटी’ची मुभा असेल, असे ते म्हणाले. बारावीच्या परीक्षांबाबत अजून निर्णय झालेला नाही. जेईई, नीट परीक्षांबाबत केंद्र सरकार दोन दिवसांत निर्णय घेणार आहे. त्यानंतर बुधवारपर्यंत बारावीच्या परीक्षांबाबत राज्य सरकार निर्णय घेईल. असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App