Adv Pradip Gavade Arrested : भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ॲड. प्रदीप गावडे यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केलेल्या टीकेमुळे ही अटक करण्यात आली आहे. एकीकडे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केल्याने गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही, मात्र अॅड. गावडे यांना कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिसांनी अटक केली आहे. Adv Pradip Gavade Arrested By Mumbai Police Due to Criticizing Sharad Pawar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ॲड. प्रदीप गावडे यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केलेल्या टीकेमुळे ही अटक करण्यात आली आहे. एकीकडे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केल्याने गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही, मात्र अॅड. गावडे यांना कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिसांनी अटक केली आहे.
भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव @PradipGavade यांना आज मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर पद्धतीने अटक केली. मुंबई पोलीस सत्ताधाऱ्यांच्या हातच खेळणं झाल आहे.सरकारवर टीका करण गुन्हा असेल तर तो आम्ही हजार वेळेस करू.@CPMumbaiPolice प्रदीपच्या केसाला जरी धक्का लागला तर जवाबदारी आपली असेल. pic.twitter.com/dbXcO2OJZl — Ram Satpute (Modi Ka Parivar) (@RamVSatpute) May 22, 2021
भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव @PradipGavade यांना आज मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर पद्धतीने अटक केली. मुंबई पोलीस सत्ताधाऱ्यांच्या हातच खेळणं झाल आहे.सरकारवर टीका करण गुन्हा असेल तर तो आम्ही हजार वेळेस करू.@CPMumbaiPolice प्रदीपच्या केसाला जरी धक्का लागला तर जवाबदारी आपली असेल. pic.twitter.com/dbXcO2OJZl
— Ram Satpute (Modi Ka Parivar) (@RamVSatpute) May 22, 2021
कोरोना महामारीमुळे अवघ्या देशात संकटाची स्थिती असताना सोशल मीडियावर मात्र राजकीय कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतोय. अनेकविध विषयांवर राजकीय पक्षांचे नेते, समर्थक एकमेकांवर टीकेची राळ उडवत आहेत. यामुळे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत जात आहेत.
अशाच एका प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर सोशल मीडियावर टीका केल्यामुळे ॲड. प्रदीप गावडे यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच प्रदीप गावडे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांवर पातळी सोडून टीका करणाऱ्या 54 जणांविरोधात तक्रार केली होती. परंतु त्या तक्रारीवर पोलिसांनी अद्यापही कोणतीही कारवाई केलेली नाही. गावडे यांना मात्र ताबडतोब कारवाई करत ताब्यात घेतले आहे.
Adv Pradip Gavade Arrested By Mumbai Police Due to Criticizing Sharad Pawar
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App