वृत्तसंस्था
मुंबई : राज्यातील वैद्यकीय परीक्षा 2 जूनऐवजी आता 10 ते 30 जून दरम्यान घेण्यात येणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी दिली. Medical Examination Will be Heald From 10 to 30 June In Maharashtra
राज्यातील वैद्यकीय परीक्षांसंदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्यासोबत देशमुख यांनी बैठक घेतली. मुंबईतील मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे.
या परीक्षांमध्ये एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी.एच.एम.एस.,बी.पी.टी.एच.,बी.ओ. टी.एच.आणि बीएससी. नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे.
या वैद्यकीय पदवी परीक्षांसोबतच मॉडर्न मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसेच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App