Indian Railway Recruitment : रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी रेल्वेमध्ये बंपर रिक्तपदे काढण्यात आली आहेत. रेल्वेच्या इतर विभागांसह पश्चिम रेल्वे मुंबईने अप्रेंटीसच्या पदांवर बंपर रिक्त जागा काढल्या आहेत. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 3,591 पदे भरली जातील. पात्र आणि इच्छुक उमेदवार 25 मेपासून या पदांसाठी अर्ज करू शकतात. Indian Railway Recruitment on 3591 posts For 10th Pass, Know How to Apply For Govt Job
विशेष प्रतिनिधी
मुंबई : रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी रेल्वेमध्ये बंपर रिक्तपदे काढण्यात आली आहेत. पश्चिम रेल्वे मुंबईने अप्रेंटीसच्या पदांवर बंपर रिक्त जागा काढल्या आहेत. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 3,591 पदे भरली जातील. पात्र आणि इच्छुक उमेदवार 25 मेपासून या पदांसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची सुरुवात – 25 मे 2021 अर्ज करण्याचा शेवट – 24 जून 2021
एकूण पदांची संख्या – 3,591 पद – अप्रेन्टिस
पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच संबंधित ट्रेडमध्ये उमेदवाराकडे आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 15 वर्षे व जास्तीत जास्त वय 24 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराच्या वयाची अट शिथिल केली जाईल.
गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. दहावीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे व आयटीआयमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या भरतीतील निवडीसाठी लेखी परीक्षा होणार नाही. मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
सर्वसामान्य आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 100 रुपये अर्ज फी भरावी लागेल.
इच्छुक आणि पात्र उमेदवार रेल्वेच्या www.rrc-wr.com या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
अधिकृत नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा.
Indian Railway Recruitment on 3591 posts For 10th Pass, Know How to Apply For Govt Job
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App