वृत्तसंस्था
मुंबई : घरोघरी जाऊन लसीकरण केले असते, तर ज्येष्ठ नागरिकांसह अनेकांचे जीव वाचविता आले असते, अशा शब्दात उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले असून वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठांना घरातच लस द्यावी, अशी सूचनाही केली. Due to increasing infection Senior Citizen’s should be vaccinated at home; Mumbai High Court Advice to Central Government
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमण वाढले आहे. ७५ वर्षांवरील नागरिक, अंथरुणावर खिळलेले रुग्ण आणि दिव्यांग नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लस देण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका वकील धृती कपाडिया आणि कुणाल तिवारी यांनी दाखल केली आहे. त्यावर सुनावणी झाली.
ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर जाण्यास असमर्थ असताना केंद्र सरकार हा उपक्रम सक्रियपणे का राबवीत नाही, असा सवाल मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला केला. २२ एप्रिल रोजी केंद्र सरकारला घरोघरी जाऊन लस देण्याची सूचना केली होती. ‘ही सूचना करून तीन आठवडे झाले तरी केंद्र सरकारने या धोरणाबाबत काहीच कसे सांगितले नाही. सरकारने यावर निर्णय घ्यावा,’ असे म्हणत केंद्र सरकारने १९ मे पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App