Madras High Court : देशात कोरोना महामारीने थैमान घातलेले आहे, दररोज तीन लाखांहून जास्त रुग्ण आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत देशात आणीबाणी लागू करण्यासाठी केंद्राला निर्देश देण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. तथापि, मद्रास उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे. Madras High Court rejects petition seeking directions to Center to declare state of emergency in the country
विशेष प्रतिनिधी
चेन्नई : देशात कोरोना महामारीने थैमान घातलेले आहे, दररोज तीन लाखांहून जास्त रुग्ण आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत देशात आणीबाणी लागू करण्यासाठी केंद्राला निर्देश देण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. तथापि, मद्रास उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे.
केंद्राला निर्देश देण्याची मागणी करणारी ही याचिका के. के. रमेश यांच्या वतीने दाखल करण्यात आली होती. याचिका फेटाळताना मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले की, कोरोनाशी लढा देण्यासाठी आधीपासून आणीबाणीसदृश्य परिस्थिती अस्तित्वात आहे.
दरम्यान, तामिळनाडूमध्येही कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ दिसून येत आहे. तामिळनाडूमध्ये आतापर्यंत 14 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या राज्यात 1.62 लाखांहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्याचबरोबर राज्यात आतापर्यंत 16 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेमुळे भारतात अद्यापही चिंताजनक स्थिती आहे. तथापि, मागच्या एक-दोन दिवसांपासून रुग्णसंख्येत घट दिसून आली आहे. परंतु कोरोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूंमुळे जास्त चिंता आहे. भारतातील कोरोना मृत्यूंनी आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. देशात पहिल्यांदाच एकाच दिवसात 4200 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाचे 3.48 लाखांवर नवे रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर देशातील कोरोना संसर्गाची एकूण प्रकरणे 2,33,40,428 वर पोहोचली आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 3,48,529 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर आणखी 4200 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर मृतांची एकूण संख्या वाढून 2,54,227 झाली आहे. गेले दोन महिने सातत्याने वाढ झाल्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही कमी होऊन 36,99,665 झाली आहे. हा दर एकूण संसर्गाच्या 16.16 टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचा दर 82.75 टक्के झाला आहे.
Madras High Court rejects petition seeking directions to Center to declare state of emergency in the country
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App