कोरोनापासून वाचण्यासाठी दारुत मिसळळे औषध, अघोरी उपायामुळे आठ जणांचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी

विलासपूर – छत्तीसगडच्या विलासपूर गावात काही युवकांनी कोरोनापासून वाचण्यासाठी दारुत होमिओपॅथी औषध मिसळले आणि त्याचे प्राशन केले. त्यामुळे दोन दिवसात आठ जणांचा मृत्यू झाला तर पाच जण आजारी पडले. Eight people died in hooch tragedy

कोरमी गावातील काही युवकांनी मंगळवारी रात्री दारूत होमिओपॅथीचे कफ सिरप ड्रोसेरा-३० मिसळले आणि त्याचे प्राशन केले. त्यांच्या मिश्रणात अल्कोहोलचे प्रमाण अधिक राहिल्याने ते जिवावर बेतले. यात बुधवारी सकाळी चौघांचा मृत्यू झाला तर सायंकाळी अन्य चौघांचा झाला. परंतु पोलिसांनी मात्र त्यांचा मृत्यू कोविडमुळे झाला असावा, असा संशय व्यक्त केला आहे. कारण त्यांच्या कुटुंबीयांनी कोणालाही न सांगता त्यांचे अंत्यसंस्कार उरकले.



या घटनेनंतर आरोग्य विभागाने गावात तळ ठोकला असून गावकऱ्यांची तपासणी सुरू केली आहे. यापैकी होमिओपॅथी सिरप मिश्रित अल्कोहोल घेतलेले काही युवक आढळून आले आहेत. यादरम्यान होमिओपॅथी क्लिनिकच्या डॉक्टरास पकडण्यासाठी पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे.

परंतु एका होमिओपॅथी डॉक्टराच्या मते, युवकांनी सिरप प्राशन केले नसेल. त्यांनी ते डाल्यूटर घेतले असेल. डाल्यूटरमध्ये गरजेपेक्षा अधिक अल्कोहोल असते आणि ते घेतल्याने यकृत, हृदयावर तत्काळ परिणाम होतो आणि मृत्यू ओढवतो.

Eight people died in hooch tragedy

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात