भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया भारतातील आपल्या मित्रांसाठी त्यांच्यासोबत उभा आहे. भारत किती खंबीर आहे हे आम्हाला माहित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी या जागतिक आव्हानावर एकत्र काम करत राहू, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी भारताला दिला आहे.Stands to help its friends, Australia assured India
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया भारतातील आपल्या मित्रांसाठी त्यांच्यासोबत उभा आहे. भारत किती खंबीर आहे हे आम्हाला माहित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी या जागतिक आव्हानावर एकत्र काम करत राहू, असा विश्वास ऑस्ट्रेलिया चे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी भारताला दिला आहे.भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युअल लेनिन यांनीही फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांचा संदेश ट्वीट केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाºया भारतातील नागरिकांना मी एकत्र राहण्याचा संदेश देत आहे. संघर्षाच्या या काळात फ्रान्स तुमच्यासोबत उभा आहे. या महासाथीनं कोणालाही सोडलं नाही. आम्ही तुमची मदत करण्यास तयार आहोत, असा संदेश इमॅन्युअल मॅक्राँ यांनी दिला होता.
चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिग यांनीही म्हटले आहे की, चीन भारताच्या मदतीसाठी तयार आहे. कोरोनाची महासाथ ही संपूर्ण मानवांची शत्रू आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला या महासाथीच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.
भारतात कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे याची माहिती मिळाली आहे. तसंच याचा सामना करण्यासाठी आणखी वैद्यकीय वस्तूंचा पुरवठाही कमी होत आहे. आम्ही भारताला आवश्यक ती मदत करण्यासाठी तयार आहोत. जेणेकरून भारताला कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App