Nashik Tragedy : पंतप्रधान म्हणाले हृदय पिळवटून टाकणारी घटना; अमित शाह, राहुल गांधींनीही व्यक्त केला शोक

Nashik Tragedy : PM Modi Condolence on 22 deaths After Oxygen Leak In Nashik, Governor Koshyari, Amit Shah, Rahul Gandhi Also expressed condolences

Nashik Tragedy :नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त करत या घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याव्यतिरिक्त नाशिक घटनेसंदर्भात उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. या घटनेवर पंतप्रधान मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, गृहमंत्री अमित शाह तसेच काँग्रेस नेते राहुल गांधींनीही दु:ख व्यक्त सहवेदना व्यक्त केल्या आहेत. Nashik Tragedy : PM Modi Condolence on 22 deaths After Oxygen Leak In Nashik, Governor Koshyari, Amit Shah, Rahul Gandhi Also expressed condolences


विशेष प्रतिनिधी

मुंबई : नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त करत या घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याव्यतिरिक्त नाशिक घटनेसंदर्भात उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. या घटनेवर पंतप्रधान मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, गृहमंत्री अमित शाह तसेच काँग्रेस नेते राहुल गांधींनीही दु:ख व्यक्त सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले, हृदय पिळवटून टाकणारी घटना

देशातील राजकीय पुढाऱ्यांनीही या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, “नाशिकमधील रुग्णालयात ऑक्सिजन टँक फुटल्यामुळे घडलेली घटना हृदय विदीर्ण आहे. या घटनेतील मृत्यूंमुळे अतिव दु:ख झाले आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना.”

गृहमंत्री अमित शाहांनी ही व्यक्त केला शोक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दुर्घटनेवर संवेदना व्यक्त केल्या. त्यांनी टि्वट केले की, “नाशिकच्या एका रुग्णालयात ऑक्सिजन लीक झाल्याची दुर्घटना ऐकून मन व्यथित झाले आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करतो. इतर सर्व रुग्णांच्या कुशलतेसाठी ईश्वराला प्रार्थना करतो.”

राहुल गांधी म्हणाले- अत्यंत दु:खद घटना

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीच्या घटनेस अत्यंत दुःखद म्हटले आहे. त्यांनी ट्वीट करून या घटनेविषयी म्हटले की, नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची घटना अत्यंत खेदजनक आहे. माझ्या संवेदना पीडित कुटुंबीयांसोबत आहेत. मी राज्य सरकार आणि कार्यकर्त्यांना सर्व शक्य मदतीचा हात देण्याचे आवाहन करत आहे.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, निरपराध रुग्ण दगावल्याचे दु:ख

नाशिकमधील दुर्दैवी घटनेवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीसुद्धा तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. “नाशिकमध्ये डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती होऊन काही निरपराध रुग्ण दगावल्याचे समजून तीव्र दुःख झाले. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना माझ्या शोक संवेदना. तसेच बाधित व्यक्तींनी लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करतो,” असे राज्यपाल म्हणाले.

दुर्घटनेच्या सविस्तर अहवालाची प्रतीक्षा

महाराष्ट्राचे एफडीए मंत्री राजेंद्र शिंगणे म्हणाले की, आम्ही सविस्तर अहवालाची वाट पाहत आहोत. आम्ही चौकशीचे आदेश दिले आहेत. जे दोषी आहेत त्यांना सोडले जाणार नाही. नाशिक आयुक्तांच्या म्हणण्यानुसार रुग्णालयात 150 रुग्ण दाखल होते. त्यापैकी 23 जण व्हेंटिलेटरवर होते, तर इतर ऑक्सिजनवर होते. असे सांगितले जात आहे की, रुग्णालयात ऑक्सिजन फिलिंग सुरू असताना गळती झाली.

गळतीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून ऑक्सिजन व्हॉल्व्ह बंद केला. पाइपलाइन गळतीमुळे गंभीर रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात हलविण्यात आले. आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, ही दुर्दैवी घटना आहे. मी नाशिक महापालिका आयुक्तांशी बोललो, ते म्हणाले की परिस्थिती आता नियंत्रणात आहे. मी लवकरच नाशिकला जाईन. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यापूर्वीच तेथे भेट दिली आहे. ऑक्सिजन गळतीसंदर्भात महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, नाशिकमध्ये टँकर व्हॉल्वह गळतीमुळे ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गळती झाली आहे. याचा निश्चितच रुग्णालयावर परिणाम होणार होता.

Nashik Tragedy : PM Modi Condolence on 22 deaths After Oxygen Leak In Nashik, Governor Koshyari, Amit Shah, Rahul Gandhi Also expressed condolences

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात