विशेष प्रतिनिधी
पुणे: शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत फ्लेक्सबाजीविरोधात पुणे महानगरपालिकेने सुरू केलेल्या अभिनव ‘भाऊ फ्लेक्स काढा’ या मोहिमेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनापासून कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत खुद्द भाजपच्या महापौर मंजुषा नागपुरे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि नगरसेवकांनाही घरचा आहेर मिळालेला असतानाच मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाच्या कारवाईचे जोरदार समर्थन केले आहे.
शुक्रवारी (27 नोव्हेंबर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत फडणवीस यांनी सांगितले की, उद्या माझ्या स्वतःच्या नावाचे जरी बेकायदा होर्डिंग लागले तरी प्रशासनाने कोणताही मुलाहिजा न ठेवता या पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करावे; नेते असोत की कार्यकर्ते, ते कायम जनतेतच दिसले पाहिजेत, बेकायदा होर्डिंग्जवर नाही.
नियम केवळ जीआरमध्ये छापण्यासाठी नसतात’; नागपूर प्रशासनालाही सतर्कतेचा इशारा
अस्सल ‘पुणेरी’ धाटणीच्या या मोहिमेचे कौतुक करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच राजकीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आरसा दाखवला आहे. शहरातील पायाभूत सुविधांचा नागरिकांना योग्य वापर करता आला पाहिजे आणि वाहनांसाठी व पायी चालण्यासाठी मोकळ्या जागा असल्या पाहिजेत; नियम हे केवळ शासकीय दस्तावेजात किंवा जीआरमध्ये (GR) छापण्यासाठी नसून ते प्रत्यक्ष पाळायचे असतात, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
खडकवासला-फुरसुंगी बोगद्याचे ६ किलोमीटर काम पूर्ण; दौंड, इंदापूर, बारामतीला मिळणार दिलासा
नागपूर अधिवेशनापूर्वी कडक खबरदारी
आगामी काळात नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार असून तिथेही नेते-कार्यकर्त्यांकडून बेकायदेशीर होर्डिंग्जचा धडाका सुरू होऊ शकतो; त्यामुळे नागपूर प्रशासनाने आत्तापासूनच जनजागृती करावी आणि शहराचे विद्रुपीकरण होणार नाही याची कडक खबरदारी घ्यावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत.
काय आहे ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहीम आणि ‘विद्रुपीकरण पुरस्काराचे’?
पुणेकरांना थेट सहभागी करून घेत महापालिकेने 24 नोव्हेंबर 2026 पासून ही डिजिटल मोहीम सुरू केली असून, पहिल्याच यादीत सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली आहे.
नागरिकांना शहरातील चौक, रस्ते, पदपथ आणि झाडांवरील अनधिकृत फ्लेक्सचे फोटो काढून bhauflexkadha.pmc.gov.in या विशेष संकेतस्थळावर अपलोड करता येतात; ज्यांचे सर्वाधिक अनधिकृत फ्लेक्स आढळतात, त्यांचे नाव व फोटो अवघ्या 24 तासांत ‘विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी’ म्हणून संकेतस्थळावर जाहीर केले जात आहेत.
पहिल्या यादीतील मानकरी
पुणे महापालिकेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून खुद्द महापौर मंजुषा नागपुरे यांनाही घरचा आहेर मिळाला असून, पहिल्या यादीत भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि सुनील पांडे यांची नावे जाहीर झाली आहेत; तर व्यावसायिक आणि ब्रँड्स गटात ब्रम्हप्रिया वर्ल्ड स्कूल, आर जीज बिर्याणी आणि शांती शिखर (शांतिप्रिया) यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App