विशेष प्रतिनिधी
पुणे: राज्यभरात गेल्या महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायांना वेग आला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीतील आकडेवारीत पुणे विभागाने राज्यात आघाडी घेतली आहे. राज्यातील सात विभागांच्या तुलनेत तपासणी आणि नमुने संकलनात पुणे विभाग प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गेल्या महिन्यात पुणे विभागाच्या कारभारात बदल करून नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्याचबरोबर राज्यातील विविध विभागांतील काही अधिकाऱ्यांचे निलंबन करून त्यांच्या जागी कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रशासकीय बदलांचे सकारात्मक परिणाम पुणे विभागातील कामकाजात दिसून आले.
खडकवासला-फुरसुंगी बोगद्याचे ६ किलोमीटर काम पूर्ण; दौंड, इंदापूर, बारामतीला मिळणार दिलासा
‘एफडीए’च्या २० नोव्हेंबरच्या अहवालानुसार, राज्यात एप्रिल ते ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांत एकूण २५ हजार ५१४ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्याध्ये पुणे विभागाचा वाटा सर्वाधिक आहे. पुण्यानंतर कोकण विभागात ५ हजार ५८९, मुंबईत ४ हजार १८६ आस्थापनांची तपासणी झाली. पुण्यात तपासणी झालेल्या आस्थापनांपैकी २ हजार ५३१ ठिकाणी सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर २२४ परवाने निलंबित करण्यात आले. राज्यभरात एकूण ११ हजार ५०६ सुधारणा नोटिसा आणि १ हजार ६५१ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्येही सर्वाधिक सुधारणा नोटीसा पुणे विभागात बजावण्यात आल्या आहेत.
याशिवाय अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी पुणे विभागातून ४ हजार ६४४ नमुने घेण्यात आले. राज्यातील सर्व विभागांमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे. या नमुन्यांच्या विश्लेषणातून १ हजार ६२३ नमुने प्रमाणित, ७६ कमी दर्जाचे, ३४ चुकीची नाममुद्रा असलेले, तर ११३ नमुने असुरक्षित असल्याचे आढळले. या प्रकरणांत २४ परवाने निलंबित करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App