डेटा सेंटर, सेमिकंडक्टर क्षेत्रात गुंतवणुकीचा महापूर; महाराष्ट्रात ८.५७ लाख कोटींचे करार

semiconductor sectors

विशेष प्रतिनिधी

मुंबई  : महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये तब्बल ८ लाख ५७ हजार ४५२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे ६७ सामंजस्य करार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या प्रस्तावित गुंतवणुकीतून राज्यात २ लाख ९१ हजार १०९ रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. semiconductor sectors

या सामंजस्य करारांमध्ये डेटा सेंटर्स, माहिती-तंत्रज्ञान आणि सेमिकंडक्टर क्षेत्राचा मोठा वाटा आहे. या तीन क्षेत्रांत मिळून ४ लाख १५ हजार ४९० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्योगविस्तार होण्याची शक्यता आहे.

ऊर्जा आणि क्लीनटेक क्षेत्रातही मोठी गुंतवणूक

ऊर्जा, क्लीनटेक, नवीकरणीय ऊर्जा, बॅटरी एनर्जी आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस या क्षेत्रांमध्ये १ लाख २ हजार ५१९ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले आहेत. या क्षेत्रांमध्ये प्रत्येकी १० करारांचा समावेश असलेल्या एरोस्पेस अँड डिफेन्स तसेच ऊर्जा आणि क्लीनटेक क्षेत्रांनाही महत्त्व देण्यात आले आहे.



अंतरिक्ष आणि संरक्षण क्षेत्रात २७ हजार ९३० कोटी रुपये, तर मेटल्स आणि मायनिंग क्षेत्रात ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रासाठी १२ हजार ६५१ कोटी रुपये आणि आरोग्य क्षेत्रासाठी ६ हजार ५०० कोटी रुपयांचे करार करण्यात आले आहेत.

पायाभूत सुविधा, स्टील आणि इतर क्षेत्रांचाही समावेश

पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स आणि बांधकाम साहित्य क्षेत्रात १८ हजार ७५१ कोटी रुपये, तर स्टील उत्पादन क्षेत्रात ७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत. याशिवाय केमिकल्स, शेती, सेवा आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCC) क्षेत्रात ८ हजार ८०१ कोटी रुपये गुंतवणूक प्रस्तावित आहे. अन्य विविध क्षेत्रांमध्ये १ लाख ८२ हजार ८१० कोटी रुपयांचे करार करण्यात आले आहेत.

उद्योगविस्तार आणि रोजगारनिर्मितीवर भर

महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमधील ६७ सामंजस्य करारांमुळे राज्यात विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः डेटा सेंटर्स, सेमिकंडक्टर, ऊर्जा, संरक्षण आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये प्रस्तावित गुंतवणुकीमुळे आधुनिक तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा विस्तार होऊ शकतो. या करारांतून अपेक्षित असलेली २ लाख ९१ हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती प्रत्यक्षात किती आणि कोणत्या टप्प्यांत होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Massive wave of investment in data center and semiconductor sectors; agreements worth ₹8.57 lakh crore signed in Maharashtra.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात