विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj Thackeray मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील आणि देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अत्यंत तीव्र आणि रोखठोक शब्दांत प्रहार केला आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्याची संस्कृती खराब होत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.Raj Thackeray
‘गलिच्छ राजकारण आणि सत्तेचा अमरपट्टा’
देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात सध्या अत्यंत घाणेरड्या आणि गलिच्छ पद्धतीने राजकारण सुरू असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. “सत्तेचा अमरपट्टा घेऊन जगात कुणीही आलेला नसतो,” अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले. राजकारणाची पातळी इतकी घसरली आहे की, समोरचे विरोधक संपवले की त्याच पक्षात अंतर्गत नवे विरोधक तयार होतात, हा निसर्गाचा नियम आहे, असे सांगत त्यांनी सध्याच्या सत्ता समीकरणांवर बोट ठेवले.Raj Thackeray
‘भाजपला इशारा आणि ऑपरेशन टायगर ३’
‘ऑपरेशन टायगर ३’ चा संदर्भ देत राज ठाकरे यांनी भाजपला भविष्यातील परिणामांचा कडक इशारा दिला. “आज जरी तुम्ही सत्तेत असलात, तरी उद्या सत्ता गेल्यानंतर भाजपलाही या सर्व गोष्टींचा आणि फोडाफोडीच्या राजकारणाचा मोठा त्रास सहन करावा लागेल,” असे ते म्हणाले. आज जे काही राजकारण सुरू आहे, त्याचा मोठा फटका पश्चिम बंगाल आणि बिहार सारख्या राज्यांना बसला असून आता महाराष्ट्रही त्याच मार्गावर असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
‘मोदींमुळे भाजप, अमित शाहांचे राजकारण’
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बोलताना राज ठाकरेंनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले. “देशात सध्या भाजप जी काही टिकून आहे, ती केवळ नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यामुळे आणि प्रभावामुळे टिकून आहे. मात्र, सध्या महाराष्ट्रात आणि देशात जे काही फोडाफोडीचे प्रकार आणि घाणेरडे राजकारण पाहायला मिळत आहे, ते सर्व अमित शाह यांचे राजकारण सुरू आहे,” असा थेट आणि गंभीर आरोप त्यांनी केला.
‘ठाकरे गटाचे खासदार अन् पुढची पिढी’
ठाकरे गटातून झालेल्या बंडावर भाष्य करताना त्यांनी सवाल उपस्थित केला. “ठाकरे गटाचे जे सहा खासदार फुटले, ते थेट शिवसेनेत (शिंदे गटात) गेले; ते भाजपमध्ये का नाही गेले?” असा प्रश्न विचारत त्यांनी यामागील राजकीय खेळीवर प्रकाश टाकला. शेवटी, फोडाफोडीच्या राजकारणालाही काहीतरी मर्यादा असतात, सध्याच्या या गलिच्छ वातावरणामुळे मला महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीची मोठी चिंता वाटते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App