महाराष्ट्राला मिळाले ४.४१ लाख टन धान्य, बाराशे टन डाळी आणि ३५ लाख मोफत सिलेंडर्स; सहा कोटींना मिळाला लाभ

सागर कारंडे

नवी दिल्ली : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गंत चीनी व्हायरसचा सामना करण्यासाठी मोदी सरकारने आतापर्यंत उद्धव ठाकरे सरकारला ४.४१ लाख टन अन्नधान्य, बाराशे टन डाळींचा पुरवठा केला आहे, तर राज्यातील ३५ लाख महिलांना मोफत सिलिंडर्स दिले आहेत. या सर्वांचा फायदा सुमारे सहा कोटींहून अधिक जनतेला झाला आहे.

ही माहिती १९ मे पर्यंतची आहे. केंद्रीय अन्न व धान्य पुरवठा मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाला सादर केलेल्या एका अहवालात आतापर्यंत पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा सारा तपशील दिला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राला दिलेल्या अन्नधान्याचा व डाळींचा तपशील आहे. याशिवाय पेट्रोलियम मंत्रालयाकडील माहितीही पंतप्रधान कार्यालयाला नित्यनेमाने दिली जात आहे.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राला आतापर्यंत ४.४१ लाख टन गहू आणि तांदूळ दिला आहे. हे धान्य ८ कोटी ८२ लाख जनतेसाठीचे आहे. म्हणजे एप्रिल व मे महिन्यातील (१९ मे पर्यंतचा) हा कोटा महाराष्ट्र सरकारला पोहोचविला आहे. या ८.८२ कोटी लाभार्थ्यांमध्ये अनेकांनी दोन महिन्यांचे धान्य घेतलेले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात लाभार्थ्यांची संख्या पाच ते साडे पाच कोटींच्यादरम्यान असेल.



* अन्नधान्य दिलेल्यांची संख्या ८.८२ कोटी असली तरी त्यापैकी अनेकांनी दोन महिन्यांचे (एप्रिल व मे) धान्य घेतलेले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात लाभार्थ्यांची संख्या पाच ते साडे पाच कोटींच्यादरम्यान असेल.

* ही आकडेवारी १९ मे २०२० पर्यंतची आहे.


त्याचबरोबर १२०० टन डाळींदेखील महाराष्ट्र सरकारला दिलेल्या आहेत. डाळी मिळत नसल्याच्या तक्रारी महाराष्ट्राच्या विविध भागांतून येत असताना ही माहिती महत्वपूर्ण आहे. संपूर्ण देशाचा विचार करावयचा झाल्यास आतापर्यंत ११४.७१ कोटी जणांना देण्यासाठी ५७.३५ लाख टन धान्य राज्यांना पोहोचविले आहे. शिवाय ११.५१ कोटी जनतेला देण्यासाठी १.१५ लाख टन डाळीही राज्यांना दिल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक जास्त वाटा दक्षिणेकडील राज्यांना मिळाला आहे.

उज्जला योजनेच्या लाभार्थ्यांना तीन सिलेंडर्स मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आतापर्यंत देशभरातील ६.६४ कोटी महिलांना मोफत सिलेंडर्स दिले आहेत, त्यापैकी महाराष्ट्रातील माय भगिनींना ३५ लाख सिलेंडर्स मिळालेले आहेत.

चीनी व्हायरसच्या या महासंकटामध्ये कोणताही गरीब विनाअन्न राहू नये, याकरिता केंद्र सरकारने १.७० लाख कोटी रूपयांची पंतप्रधान गरीब कल्याण योजना जाहीर केली होती. त्यामध्येच पंतप्रधान गरीब अन्न योजनेचाही अंतर्भाव आहे. त्यानुसार, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत जे अन्नधान्य मिळते आहे, त्याच्याव्यतिरिक्त प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ व गहू आणि एक किलो डाळ पुढील तीन महिन्यांसाठी (एप्रिल ते जून) देण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती.

त्यानुसार राज्यांना १२५.८८ लाख टन धान्य व डाळी दिल्या जाणार आहेत. शिवाय स्थलांतरीत मजुरांसाठी, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही किंवा जे अन्न सुरक्षा कायद्याखाली पात्र नाहीत, अशा सुमारे आठ कोटी स्थलांतरितांसाठी प्रति व्यक्ती पाच किलो गहू किंवा तांदूळ आणि एक किलो डाळ असे धान्य दोन महिन्यांसाठी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र अशी साडेतीन हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात