विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sunetra Pawar सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा यांचा विजय झाला आहे. त्यामुळे त्यांना आपले राज्यसभा सदस्यत्व सोडणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार, त्यांनी आज उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. दरम्यान, सुनेत्रा पवार आपल्या दिल्ली दौऱ्यात भाजप पक्षश्रेष्ठींचीही भेट घेतील असा अंदाज आहे.Sunetra Pawar
सुनेत्रा पवार यांची 18 जून 2024 रोजी राज्यसभेच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाली होती. तेव्हापासून त्या दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाल्या होत्या. पण अजित पवारांचे गत 28 जानेवारी रोजी निधन झाले आणि त्यांना राज्याच्या राजकारणात परतावे लागले. त्या सध्या सत्ताधारी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून राज्यात सक्रिय आहेत. नियमानुसार, कोणत्याही व्यक्तीला एकाचवेळी दोन सभागृहांचे सदस्यपद भूषवता येत नाही. त्यामुळे बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील विजयानंतर त्या राज्यसभेचे आपले सदस्यत्व सोडतील अशी अपेक्षा होती.Sunetra Pawar
त्यानुसार, आज त्यांनी दिल्ली दौऱ्यावर जाऊन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्याकडे आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेचा मार्ग अधिक स्पष्ट होणार आहे. आता सुनेत्रा पवार यांच्या रिक्त जागेवर कुणाची नियुक्ती होणार? याची चर्चाही राजकारणात सुरू झाली आहे.
भाजप नेत्यांची भेट घेण्याचाही अंदाज
दिल्ली दौऱ्यात सुनेत्रा पवार भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांचीही भेट घेतील, अशी चर्चा आहे. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेण्याची चिन्हे आहेत.
या संभाव्य भेटींमध्ये राज्यातील राजकीय घडामोडी, महायुती सरकारमधील समन्वय, आगामी निवडणुकांची तयारी आणि धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तथापि, या भेटींबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. तरीही या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्याकडे राज्यातील सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे राज्यसभेतील जागेवरही परिणाम होणार आहे. तसेच, विधानसभेत त्यांच्या सक्रिय सहभागामुळे राज्यातील सत्तासमीकरणांवरही परिणाम होऊ शकतो. या दौऱ्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय हालचाली काय असतील, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App