वृत्तसंस्था
चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपने लाडक्या बहिणींवर आणि शेतकऱ्यांवर आज तुफान सवलतींचा वर्षाव केला. दोन हजार रुपयांपासून ते थेट 50 लाख रुपयांपर्यंत खर्चाच्या योजना भाजपने जाहीर केल्या.
केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते भाजपने आज तामिळनाडू साठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष नागेंद्र आणि भाजपचे वरिष्ठ नेते अण्णामलाई उपस्थित होते. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना दर महिना दोन हजार रुपये, मोफत एलपीजी गॅस सिलेंडर, प्रत्येक घरात वार्षिक दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली.
त्याचबरोबर भाजपने शेतकऱ्यांवर सुद्धा सवलतींचा वर्षाव केला. तामिळनाडूच्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे सहा हजार रुपये मिळत आहेतच, पण त्यावर राज्य सरकारकडून आणखी तीन हजार रुपये देण्याची घोषणा भाजपने केली.
#WATCH | BJP releases its manifesto for the upcoming Tamil Nadu Assembly elections in Chennai. Union Minister JP Nadda, Tamil Nadu BJP president Nainar Nagenthran, and BJP leaders K Annamalai and Tamilisai Soundararajan present at the event. pic.twitter.com/mMGT3rbVmK — ANI (@ANI) April 14, 2026
#WATCH | BJP releases its manifesto for the upcoming Tamil Nadu Assembly elections in Chennai.
Union Minister JP Nadda, Tamil Nadu BJP president Nainar Nagenthran, and BJP leaders K Annamalai and Tamilisai Soundararajan present at the event. pic.twitter.com/mMGT3rbVmK
— ANI (@ANI) April 14, 2026
तामिळनाडू महिलांच्या नेतृत्वाखाली सहकार चळवळ विकसित करण्यासाठी भाजपने मोठ्या योजना जाहीर केल्या. महिलांच्या नेतृत्वाखालील सहकारी उद्योगास 50 लाख रुपयांपर्यंतचे शून्य व्याजदराचे कर्ज, तिथे उत्पादन झालेल्या वस्तूंना हमीभाव देण्याचे आश्वासन दिले. त्याच बरोबर भाजपने महिलांना ई स्कूटर खरेदी करण्यासाठी प्रत्येक पंचवीस हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले.
भाजपने आपल्या जाहीरनाम्यात महिला सुरक्षेवर भर दिला असून तामिळनाडूतील प्रत्येक शाळा, कॉलेज, विद्यापीठ आणि सार्वजनिक ठिकाणी शंभर टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे आश्वासन दिले. महिलांविरुद्धचे जुने रोखण्यासाठी झिरो एफआयआर नोंदणी, महिलांना न्याय देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट, निर्भय फंडाचा शंभर टक्के वापर या मुद्द्यांचाही आश्वासनामध्ये समावेश केला.
– भाजप लढवतो 28 जागा
भाजपा तामिळनाडू विधानसभेची निवडणूक जयललिता यांच्या अखिल भारतीय अण्णा मुन्नेत्र कळघम पक्षाबरोबर युती करून लढवत आहे. तामिळनाडूच्या 234 जागांपैकी भाजपच्या वाट्याला युती मधल्या 28 जागा आहेत. भाजपचे उमेदवार 28 जागा लढवत आहेत. पण भाजपने अण्णा द्रमूक बरोबर सत्तेवर आलो, तर वर उल्लेख केलेली सगळी आश्वासने पाळायचे आश्वासन दिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App