सिक्कीमने फटकारल्यानंतर दिल्ली सरकार प्रशासनावर चूक ढकलून नामानिराळे…!!

  • दिल्ली सरकारच्या जाहिरातीत सिक्कीमचा उल्लेख “राज्य” नव्हे; “देश”…!!

विशेष प्रतिनिधी

गंगटोक / नवी दिल्ली : सिक्कीम राज्याला दिल्ली सरकारच्या अधिकृत जाहिरातीमध्ये स्वतंत्र देश दाखविण्याचा मुद्दा दिवसभर वादग्रस्त ठरला. हा मुद्दा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आणि सरकारवर राजकीय दृष्ट्या शेकायला लागल्यावर जाहिरातीतील चुकीची जबाबदारी सरकार दिल्ली प्रशासनावर ढकलून मोकळे झाले.

दिल्ली सरकारने भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली. त्यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा फोटोही प्रसिद्ध केला. यात अर्जासाठी पात्र उमेदवारांसाठी असलेल्या निकषांमध्ये उल्लेख करताना सिक्कीमचा “राज्य” या शब्दाऐवजी “देश” या शब्दाने करण्यात आला होता. ही चूक प्रथम दिल्ली सरकारच्या लक्षात आली नाही. सोशल मीडियावरून टीकेचा भडिमार सुरू झाल्यावर दिल्ली सरकारला जाग आली. पण तरीही सरकार मागे हटायला तयार नव्हते.

 

सायंकाळी प्रत्यक्ष सिक्कीमच्या मुख्य सचिवांनी दिल्ली सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिल्यावर मात्र या प्रकाराचे प्रशासकीय आणि राजकीय गांभीर्य दिल्ली सरकारच्या लक्षात आले. आणि सिक्कीमचा उल्लेख “देश” असा करण्याची चूक दिल्ली प्रशासनावर ढकलून केजरीवाल सरकारने मोकळे होण्याचा प्रयत्न केला.

सिक्कीम १९७१ मध्ये भारतीय संघराज्यात सामील करवून घेण्यात आले. सुरवातीला त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. नंतर त्याला संपूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्यात आला.

मात्र राष्ट्रीय एेक्याच्या दृष्टीने एवढ्या महत्त्वाच्या विषयाचे गांभीर्य दिल्लीच्या केजरीवाल सरकारला नव्हते हे मात्र या निमित्ताने अधोरेखित झाले.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात