विशेष प्रतिनिधी
बारामती : Baramati Bypoll 2026 बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर काँग्रेसने बारामतीतून उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. अखेर अनेक घटना-घडामोडींच्यानंतर काँग्रेसने अखेर निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. या घडामोडीमुळे बारामतीतील निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग अधिक सुखकर झाला आहे.Baramati Bypoll 2026
23 उमेदवार रिंगणात कायम
बारामतीत एकूण 53 उमेदवारांचे अर्ज कायम होते. यापैकी 30 उमेदवारांनी माघार घेतली असली तरी अद्याप 23 उमेदवार हे रिंगणात कायम आहेत. त्यामुळे बारामतीत बिनविरोध निवडणूक होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. मात्र आता काँग्रेस पक्षाच्या माघारीमुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग अधिक सुखकर झाला आहे.Baramati Bypoll 2026
अपघाताची योग्य चौकशी व्हायला हवी
सपकाळ यांनी अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात काँग्रेसची भूमिका पुन्हा अधोरेखित केली. एवढ्या मोठ्या नेत्याच्या अपघाताची योग्य चौकशी व्हायला हवी. एफआयआर दाखल होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत, असे ते म्हणाले. तसेच पार्थ पवार यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीबाबत दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्ट केली काँग्रेसची भूमिका
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने अखेर माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मात्र, निवडणुकीतून माघार घेतली असली तरी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे या निर्णयानंतरही राजकीय समीकरणांमध्ये अनिश्चितता कायम असल्याचे दिसून येत आहे.
सकपाळ यांची मोरेंसोबत चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतल्यानंतर सपकाळ यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मोरे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला आहे. मात्र, या दरम्यान काय बोलणे झाले? याची सविस्तर माहिती अद्याप समोर आली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App