अमेरिका – इराण युद्धात म्हणे, मोदी “टेलिफोन ऑपरेटर”; तर मग जे. डी. व्हान्स आणि वांग यी कोण??

नाशिक : अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात नरेंद्र मोदींनी म्हणे टेलिफोन ऑपरेटरची भूमिका अदा केली. जागतिक प्रवक्ते संजय राऊत यांनी हे वक्तव्य केल्याने त्याला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. पण अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात जर मोदी टेलिफोन ऑपरेटर असतील तर मग जे. डी. व्हान्स आणि वांग यी हे कोण आहेत??, असा सवाल समोर आला.Sanjay Raut targets Narendra Modi as telephone operator

अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यान युद्ध पेटल्याने त्याचा परिणाम सर्व आखाती देशांवर झाला. जगातली इंधनपुरवठा साखळी तुटली. त्याचा परिणाम भारतावर सुद्धा झाला. हा परिणाम कमीत कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आखाती देशांमध्ये सर्व प्रमुख नेत्यांशी संपर्कात राहून फोनवर चर्चा केली. त्या प्रत्येक चर्चेचे ट्विट त्यांनी स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवरून करून भारतीयांना सविस्तर माहिती दिली. यामध्ये नरेंद्र मोदींनी कुठेही आपण स्वतः इराण आणि अमेरिका यांच्यातली युद्ध थांबवायची मध्यस्थी करत आहोत, असे बिलकुल म्हटले नव्हते.



– संजय राऊतांची अनाठायी टीका

तरीसुद्धा संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींनी अमेरिका आणि इराण यांच्याविरुद्ध टेलिफोन ऑपरेटरची भूमिका बजावली, अशा शब्दांमध्ये खिल्ली उडवली.

पण संजय राऊत यांनी मोदींची अशी खिल्ली उडवल्यामुळे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे नेमके कोण आहेत आणि त्यांनी या युद्धादरम्यान काय भूमिका बजावली??, असा सवाल समोर आला.

– अमेरिकेच्या उपाध्यक्षांचे ५० कॉल

कारण नरेंद्र मोदींनी जर आखाती देशांमधल्या प्रमुखांना अनेकदा फोन करून त्यांच्याशी चर्चा केली असेल आणि ते जर टेलिफोन ऑपरेटर ठरले असतील, तर जे डी व्हान्स यांनी किमान 50 फोन आंतरराष्ट्रीय पातळीवर केले, अशी माहिती समोर आली. कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हान्स यांच्यावरच आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या महत्त्वाच्या नेत्यांशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी दिली होती. अर्थातच व्हान्स यांनी सातत्याने जागतिक नेत्यांची फोनवरून संपर्क करून अमेरिकेची भूमिका वारंवार विशद केली होती.

– चिनी परराष्ट्र मंत्र्यांचे 26 कॉल

त्याचबरोबर चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी सुद्धा युद्ध थांबविण्यासाठी तब्बल 26 फोन कॉल केल्याची माहिती चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी दिली. हे सगळे फोन कॉल त्यांनी अमेरिकन परराष्ट्रमंत्री आणि इराणी परराष्ट्रमंत्री यांना केले होते.

– पेच प्रसंगात फोन कॉल ही सामान्य बाब

अर्थात मोठ्या युद्धाच्या प्रसंगात किंवा आंतरराष्ट्रीय पेच प्रसंगांमध्ये मोठे नेते असेच एकमेकांशी फोनवरून संपर्कात राहत असतात, म्हणून काय ते सगळे “टेलिफोन ऑपरेटर” ठरत नसतात. संजय राऊत यांच्यासारख्या जागतिक प्रवक्त्याने कितीही उथळ टीका केली, तरी तिला प्रसिद्धी देण्याची मराठी माध्यमांना खाज असल्याने त्यांनी मोदींच्या मुत्सद्देगिरीचे वर्णन “टेलिफोन ऑपरेटर” अशा शब्दांमध्ये केले. पण जे. डी. व्हान्स आणि वांग यी यांचे वर्णन मात्र फार मोठे “मुत्सद्दी” असे केले. पण म्हणून ते खरेच आहे, असे समजायचे काही कारण नाही.

Sanjay Raut targets Narendra Modi as telephone operator

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात