विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uday Samant नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात गंभीर आरोप करताना खळबळजनक माहिती समोर आणली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, पुराव्यांमध्ये अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांच्यात 177 वेळा, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याला 17 वेळा फोन केल्याचे दिसून येत आहे. हे फोन कॉल नेमके कोणत्या कारणासाठी करण्यात आले, असा थेट सवाल दमानिया यांनी उपस्थित केला असून, त्यांच्या या आरोपांवर आता मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.Uday Samant
उदय सामंत म्हणाले, उदय सामंतांनी फोन केलाय का? आता ज्यांचे फोनवर बोलणे झाले, त्यांनी अशोक खरातच्या कृत्याचे समर्थन केलेले नाही. आता त्याने या नेत्यांशी बोलणे झाल्यावर त्याचा गैरफायदा घेऊन हे कृत्य केले आहे. मात्र ही वृत्ती संपुष्टात आणण्याची भूमिका शिवसेनेची आहे. आमच्या बाजूला येऊन काही लोक फोटो घेतात. मग त्याने काही चुकीचे कृत्य केले तर त्यात आम्ही सामील आहोत का? असा सवाल सामंत यांनी उपस्थित केला.Uday Samant
हॉटेल व्यावसायिकांना सुरळीत गॅस पुरवठा करण्याच्या स्पष्ट सूचना
एमएनजीएलकडून हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवठा करण्यास होत असलेल्या दिरंगाईची गंभीर दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिकांना सुरळीत गॅस पुरवठा करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तरीही हा तुटवडा जाणीवपूर्वक किंवा कृत्रिमरित्या निर्माण केला जात असल्याचे आढळल्यास सरकार संबंधितांवर कठोर पावले उचलेल, असे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
दुसरीकडे, मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक स्तरावर ‘लिक्विफाइड नॅचरल गॅस’ च्या वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून त्याचे सावट पुरवठ्यावर दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. त्यानुसार, नागरिकांना दैनंदिन वापरासाठी 100 टक्के सीएनजी गॅस उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तर व्यावसायिक वापरासाठी हा पुरवठा 80 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App