विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sunil Tatkare दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात माहिती मला होते. त्याला माझा विरोध नव्हता, असा खळबळजनक खुलासा सुनील तटकरे यांनी केला आहे. अजितदादा असताना आणि नसताना होणाऱ्या विलीनीकरणात खूप फरक आहे. विलीनीकरण करू पण सुनेत्रा वहिनींना नेता निवडा, असे शरद पवार गटातील कोणी म्हटले नाही, असेही त्यांनी म्हटले.Sunil Tatkare
अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतच्या चर्चांनी जोर धरला होता. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण व्हावे, अशी अजित पवारांची अंतिम इच्छा होती. दोन्ही पक्षाचे विलीनीकरण अंतिम टप्प्यात आले होते. दोन्ही गटातील नेत्यांच्या काही बैठकींचे व्हिडिओ आणि फोटो देखील समोर आले होते. हे व्हिडिओ विलीनीकरणासंदर्भातील बैठकीचेच असल्याचे सांगण्यात आले होते. यावर सुनील तटकरे यांनी प्रथमच उघडपणे भूमिका मांडली.Sunil Tatkare
नेमके काय म्हणाले सुनील तटकरे?
सुनील तटकरे यांनी नुकतीच ‘एबीपी माझा’च्या एका कार्यक्रमात मुलाखत दिली. या मुलाखतीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले, “दादांचे पार्थिव पोस्ट मॉर्टम करुन पहिल्या दिवशी अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात आणले. अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी झाले. पहिल्या दिवशीच काही जबाबदार नेत्यांनी “दादांची विलीनीकरणाची अंतिम इच्छा होती, विलीनीकरण अंतिम टप्प्यात आले होते. या तारखेला विलीनीकरण होणार होते,” अशा मुलाखती दिल्या. आणखी एक सो कॉल्ड व्हिडिओ, दादा त्या बैठकीला बसलेत आणि ते सगळे असे ते झाले. सलग दोन दिवस त्या मुलाखती सुरु राहिल्या. त्यावेळी मी बोलण्याच्या स्थितीत नव्हतो. बोललो असतो तर अश्रूंचा बांध आवरला नसता. पण ज्या पद्धतीने ते सुरु झाले त्यामागील राजकीय अर्थ मला उमजत होता.”
वहिनींना नेता करू असे कुणीही म्हटले नाही
सुनील तटकरे म्हणाले, “मी विलीनीकरणाच्या कधीही विरोधात नव्हतो आणि मला त्या गोष्टीची माहिती होती. मात्र, अजितदादा असतानाचे विलीनीकरण आणि दादा नसतानाचे विलीनीकरण यात खूप मोठा फरक आहे. विलीनीकरण करू पण सुनेत्रा वहिनींना नेता निवडा, असे त्यांच्यातील (शरद पवार गट) कोणीही म्हटले नाही. आम्ही भाजपसोबत आणि एनडीएचा भाग आहोत. पण विलिनीकरणाचा जो सिनॅरिओ दादांच्या हयातीत होता, तो आता बदलला आहे.”
२२ जुलैला काळजाला चटके बसतील!
अजित पवार आणि सुनील तटकरे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. या मैत्रीच्या आठवणींना उजाळा देताना सुनील तटकरे भावूक झाले. ते म्हणाले, “१९९९ पासून २२ जुलैला दादांचा वाढदिवस साजरा करताना मी कधीही गैरहजर राहिलो नाही. मात्र, आगामी २२ जुलै २०२६ हा दिवस माझ्यासाठी आणि कमालीचा वेदनादायी असेल. दादांना प्रत्यक्ष जाऊन शुभेच्छा द्यायला ते आज आपल्यात नाहीत, हे वास्तव स्वीकारणे खूप दु:खद आहे.”
सुनेत्रा वहिनींची निवड ‘सामूहिक’ निर्णय
अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाचा उत्तराधिकारी निवडण्याचे मोठे आव्हान होते. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले, “सुनेत्रा वहिनींनी दादांना दीर्घकाळ खंबीर साथ दिली आहे. ती आम्ही लक्षात घेतली आणि वहिनींसोबत चर्चा केली. विधिमंडळ पक्षाचा नेता निवडणे, शपथविधीची प्रक्रिया पूर्ण करणे, मुख्यमंत्र्यांची मान्यता घेणे, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मान्यता घेणे, हे करणे गरजेचे होते. हा निर्णय मी एकट्याने घेतला नाही, तर प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांसारख्या ज्येष्ठ सहकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही सर्वांनी केले.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App