भाजपच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांबरोबरच पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन यात्रेत देवेंद्र फडणवीस यांचा प्रमुख सहभाग

– देवेंद्र फडणवीसांची पश्चिम बंगाल मधल्या वीरभूम पासून परिवर्तन यात्रा!!

नाशिक : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या भाजपने सुरू केलेल्या परिवर्तन यात्रेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले पश्चिम बंगालमध्ये आजच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कृषिमंत्री शिवराज सिंह आणि भाजपचे अन्य नेते सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणाहून परिवर्तन यात्रा काढत आहेत. यापैकी वीरभूम जिल्ह्यातून निघालेल्या परिवर्तन यात्रेचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेने झाले. Devendra Fadnavis

– नितीन नवीन पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवर

पश्चिम बंगाल मध्ये आज एकाच दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन कृषी मंत्री शिवराज सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी भाजपची मोठी फौज परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दार्जिलिंग मध्ये गोरखा संवाद मेळाव्यातून परिवर्तन यात्रेला सुरुवात केली. त्याआधी कालच त्यांनी इस्लामपूर मध्ये परिवर्तन यात्रेला हिरवा झेंडा दाखविला. नितीन नवीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांची राष्ट्रीय पातळीवरची ही पहिलीच निवडणूक आहे.

अमित शाह यांनी दक्षिण परगणा जिल्ह्यातल्या रायदिघी पासून परिवर्तन यात्रेला सुरुवात केली तर राजनाथ सिंह यांनी हावडा मधून या यात्रेला हिरवा झेंडा दाखविला. शिवराज सिंह यांनी उत्तर परगणा जिल्ह्यात परिवर्तन यात्रा काढली.

-294 पैकी 250 मतदारसंघांमध्ये परिवर्तन यात्रा

पश्चिम बंगाल मधल्या 294 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 250 विधानसभा मतदारसंघातून या वेगवेगळ्या परिवर्तन यात्रा जाणार असून राज्यात कोणत्याही स्थितीमध्ये ममता बॅनर्जी यांचे घालवायचे आणि भाजपचे सरकार आणायचे हाच या परिवर्तन यात्रेचा इरादा आहे.

– फडणवीसांचे राजकीय स्थान उंचावले

पश्चिम बंगालमधल्या आजच्या परिवर्तन यात्रेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय स्थान भाजपच्या केंद्रीय नेत्यांमध्ये पोहोचल्याचे स्पष्ट झाले. भाजपने त्यांना आधीच मुख्य पार्लमेंटरी बोर्डात स्थान दिले आहे पण ते पक्षीय पातळीवर आहे त्यापलीकडे जाऊन वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुकांच्या प्रचारसभा मध्ये प्रमुख नेता म्हणून उतरवून भाजपने देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर प्रस्थापित करण्याचा “डाव” खेळला आहे.

याआधी देवेंद्र फडणवीस बिहार मधले निवडणूक प्रभारी होते त्यानंतर झारखंड निवडणुकीत सुद्धा त्यांनी आघाडीवर राहून प्रचार केला होता त्या पाठोपाठ तेलंगणामध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन प्रचार सभा घेतल्या होत्या.

आता तर भाजपच्या केंद्रीय पातळीवरच्या सर्वोच्च फळीतल्या नेत्यांच्या बरोबर देवेंद्र फडणवीस यांचे नाव झळकले असून राजनाथ सिंह, अमित शाह यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीसच पश्चिम बंगालमध्ये मैदानात उतरल्याचे दिसून आले.

– Devendra Fadnavis’ transformation journey from Virbhum in West Bengal!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात