राज्यसभेसाठी “एकमेव” शरद पवार म्हणणाऱ्या संजय राऊतांना अखेर त्यांना इतर उमेदवारांच्या स्पर्धेत करावे लागले उभे!!

नाशिक : महाविकास आघाडीतून राज्यसभेसाठी “एकमेव” उमेदवार शरद पवार असे म्हणणाऱ्या संजय राऊत यांना अखेर त्यांना इतर उमेदवारांच्या स्पर्धेत आज उभे करावे लागले. कारण राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतली स्पर्धा त्यांच्याच शिवसेनेतून तीव्र बनली. Sanjay Raut

– दिल्ली आणि मुंबईत लॉबिंग

महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे संख्याबळ लक्षात घेता आघाडीतून फक्त एक उमेदवार निवडून जाऊ शकतो. कारण राज्यसभेसाठी 37 आमदारांच्या मतांची गरज असताना महाविकास आघाडीकडे 46 आमदार आहेत. त्यांच्याकडे फक्त 9 मते अतिरिक्त आहेत. त्यामुळे त्या अतिरिक्त मतांच्या बळावर आणखी एक उमेदवार निवडून जाऊ शकत नाही. त्यामुळेच सुरुवातीपासून संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे “एकमेव” उमेदवार म्हणून शरद पवारांचे नाव पुढे रेटले होते. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा दिल्ली आणि मुंबईत शरद पवारांच्या नावासाठी लॉबिंग केले होते.

– आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांनी मारली पाचर

पण आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांच्यासारख्या शिवसेनेच्या तरुण आमदारांनी पवारांच्या एकमेव उमेदवारी पाचर मारून ठेवली. प्रत्येक वेळेला शिवसेनेने त्याग का करायचा??, असा उचित सवाल त्यांनी करून शिवसेनेच्या हक्काची राज्यसभा जागा त्यांनी शिवसेनेसाठीच मागितली. कारण फौजिया खान यांच्या निवडणुकीच्या वेळी शरद पवारांनी शिवसेनेची हक्काची जागा राष्ट्रवादीसाठी मागून घेतली होती आता त्या स्वतः आणि शरद पवार निवृत्त होत असताना राजकीय परिस्थिती बदलली म्हणून महाविकास आघाडीचा एकमेव उमेदवार निवडून येत असताना शरद पवारांनी स्वतःची उमेदवारी संजय राऊत यांच्यामार्फत पुढे रेटली.



– महाविकास आघाडी एकदिलाने पवारांच्या पाठीशी नाही

संजय राऊत यांनी सुरुवातीला नेटाने शरद पवारांची एकमेव उमेदवारी असल्याचे भासवून तशा पत्रकार परिषदा घेतल्या, पण आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांनी शिवसेनेची बाजू लावून धरली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर थेट मल्लिकार्जुन खर्गे यांच्याच उमेदवारीची तरफदारी केली त्यामुळे शरद पवारांची “एकमेव” उमेदवारी ढासळली. शरद पवार यांच्यासारख्या 60 वर्षांची संसदीय कारकीर्द असलेल्या नेत्याच्या पाठीमागे महाविकास आघाडी एकदिलाने आणि एकमताने उभी नाही, हे राजकीय वास्तव समोर आले. त्यामुळे शरद पवारांना स्वतःच्या उमेदवारीसाठी इतर उमेदवारांच्या स्पर्धेत उतरावे लागले.

याची कबुलीच आज संजय राऊत यांनी दिली. काँग्रेसकडून कोण इच्छुक आहेत हे माहिती नाही पण शिवसेनेकडून राजन विचारे आणि विनायक राऊत दोन माजी खासदार इच्छुक आहेत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. किंबहुना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या आग्रही भूमिकेमुळे त्यांना ते वक्तव्य करावे लागले. म्हणजेच शरद पवारांना काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराच्या आणि राजन विचारे विनायक राऊत या दोन माजी खासदारांच्या रांगेत स्पर्धेमध्ये उभे राहावे लागले.

राज्यसभा निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस 5 मार्च आहे. तोपर्यंत ही स्पर्धा तीव्र राहणार असून शरद पवार हे सर्वांत ज्येष्ठ नेते म्हणून स्पर्धेत आघाडीवर राहणार आहेत.

Sanjay Raut, who called Sharad Pawar the “only” candidate for the Rajya Sabha, finally had to put him in the competition of other candidates!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात