नाशिक : शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीसाठी दिल्ली आणि मुंबईत करावी लागतेय लॉबिंग आणि अजित पवारांच्या विमान अपघात संदर्भात FIR दाखल करण्यासाठी बारामतीत वकिलांच्या फौजेसह करावे लागतेय शक्तिप्रदर्शन!!, हे महाराष्ट्रातले राजकीय वास्तव आज समोर आले.
महाराष्ट्र आणि बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जात असताना महाराष्ट्राच्या राजकारणाने कशी कूस बदलली आहे, याचेच प्रत्यंतर आज आले. महाराष्ट्राच्या राजकारणात आता देवेंद्र फडणवीस यांचा “शब्द” चालतो. शरद पवारांचा “शब्द” तेवढा “वजनदार” उरलेला नाही, हेच वास्तव दोन घटनांच्या निमित्ताने समोर आले.
– पवारांच्या खासदारकीसाठी करावे लागतेय लॉबिंग
सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीसाठी दिल्ली आणि मुंबईत लॉबिंग चालवली आहे. त्यांना महाविकास आघाडी कडून राज्यसभेवर पाठवायचे असेल, तर काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांशी त्यांना चर्चा करावी लागत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांचे आणि उद्धव ठाकरे यांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. तरी महाराष्ट्रातल्या नेत्यांचे मन वळेलच, याची राष्ट्रवादीच्या नेत्यांना गॅरेंटी नाही.
एरवी शरद पवारांनी नुसती इच्छा जरी व्यक्त केली असती, तरी ते राज्यसभेत सहज पोहोचू शकले असते. पण आता शरद पवारांचे तेवढे राजकीय बळ उरलेले नाही. त्यांच्याकडे तेवढी आमदारांची शक्ती सुद्धा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 आमदारांच्या बळावर राज्यसभेतच काय, पण विधान परिषदेतही पोहोचता येत नाही. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईत लॉबिंग करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
– रोहित पवारांना करावे लागले शक्तिप्रदर्शन
एकीकडे पवारांच्या राज्यसभा खासदारकीसाठी एवढे “खाली” उतरावे लागले असताना दुसरीकडे अजित पवारांच्या विमान अपघाता संदर्भात मोठा बवाल उभा करून रोहित पवारांना मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात DGCI आणि VSR कंपनी यांच्या विरोधात FIR सुद्धा दाखल करता आला नाही. म्हणून त्यांनी आज बारामतीत शक्तिप्रदर्शन करून बारामतीतल्या पोलीस ठाण्यात DGCI आणि VSR कंपनी यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचा प्रयत्न केला. किंबहुना त्यांना तो करावा लागला. त्यासाठी बारामतीतल्या पोलीस ठाण्यात वकिलांची फौज उभी करावी लागली. DGCI आणि VSR कंपनीच्या विरोधात नुसता तक्रार अर्ज दाखल करून उपयोग नाही. त्यासाठी वेगवेगळ्या फौजदारी कलमांखाली FIR दाखल करता येऊ शकतो, असे रोहित पवारांच्या वकिलांच्या फौजेने पोलिसांच्या गळी उतरवायचा प्रयत्न केला. किंबहुना त्यांना तसा प्रयत्न करावा लागला.
– दुटप्पी खेळाचा परिणाम गंभीर
एरवी बारामतीतल्या कुठल्याच बाबतीत “पवारांचा शब्द” कुणी टाळू शकेल, अशी परिस्थिती तिथे कधीच नव्हती. पवारांच्या घरातून नुसता फोन गेला तरी FIR काय, पण खऱ्या किंवा खोट्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक सुद्धा केली असती. किंबहुना पवारांच्या घरातल्यांच्या दबावाखाली पोलिसांना कारवाई करावी लागली असती. पण पवारांच्याच double game ने त्यांचा खेळ फसवला. एकीकडे कुठल्या का होईना, पण पवारांनीच सत्ता भोगायची आणि दुसरीकडे विरोधकांची देखील political space बळकवायची, असल्या दुटप्पी खेळामुळे सर्वच पवारांची political value घटली म्हणून त्यांना बारामतीत सुद्धा शक्तिप्रदर्शन करावे लागले. बारामतीतल्या पोलीस ठाण्यात वकिलांची फौज उभी करावी लागली. पण एवढे करून सुद्धा रोहित पवारांच्या हाती निराशाच लागली कारण बारामतीच्या पोलिसांनी सुद्धा FIR दाखल करून घ्यायला नकार दिला. पण रोहित पवारांच्या असल्या “उद्योगांमुळे” दोन्ही राष्ट्रवादी मधली फूट तर गहिरी होईलच, पण पवार कुटुंबातही उरला सुरलेला राजकीय एकोपा तुटायला वेळ लागणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App