Sunil Tatkare : अजितदादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कारवाई होणार, सुनील तटकरेंचा इशारा, रोहित पवारांवर साधला अप्रत्यक्ष निशाणा

Sunil Tatkare

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sunil Tatkare  राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही गटांतील राजकीय तणाव कमालीचा वाढला असून, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित दादांचे विमान मुद्दाम पाडले, असा खळबळजनक आरोप करत थेट व्हीएसआर कंपनीवर संशय व्यक्त केला आहे. रोहित पवारांनी अजित पवारांचे एआय व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणांचे कौतुक करत काही नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला असतानाच, आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवारांच्या आवाजातील एआय व्हिडिओ बनवणाऱ्यांना थेट इशारा देत अप्रत्यक्षपणे रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.Sunil Tatkare

सुनील तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या आवाजातील व प्रतिमेतील एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या बनावट चित्रफिती व ध्वनिफिती समाजमाध्यमे तसेच विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही व्यक्ती स्वार्थी राजकीय व सामाजिक हेतू साध्य करण्यासाठी आदरणीय दादांच्या आवाजात खोटी, दिशाभूल करणारी वक्तव्ये पसरवत आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे. दादांबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात अपार आदर, प्रेम आणि विश्वासाची भावना आहे. त्या भावनेचा गैरफायदा घेऊन जनतेमध्ये व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा घातक प्रयत्न आहे. अशा प्रकारे दिवंगत नेत्याच्या प्रतिमेचा वापर करणे हे अत्यंत हीन आणि निषेधार्ह कृत्य आहे.Sunil Tatkare



तसेच पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्पष्टपणे इशारा देतो की, संबंधित व्यक्तींनी अशा एआय-निर्मित बनावट चित्रफिती व ध्वनिफितींचे प्रसारण तात्काळ थांबवावे. अन्यथा संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सायबर कायद्यांनुसार व अन्य लागू कायद्यांनुसार गुन्हे नोंदवून दोषींना शिक्षा व्हावी यासाठी पक्ष कटिबद्ध आहे. तसेच, जनतेला व सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येते की, अशा कोणत्याही संशयास्पद ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप्स पुढे पाठवू नयेत, प्रसारित करू नयेत आणि त्यावर विश्वास ठेवू नये. सत्यतेची खात्री न करता कोणतीही माहिती शेअर करणे टाळावे, असा इशारा देखील दिला आहे.

दिवंगत अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने असत्य प्रचार करणे हे समाजहिताला बाधक असून लोकशाही मूल्यांना धक्का देणारे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा सर्व कृत्यांचा तीव्र निषेध करीत असून संबंधितांनी तात्काळ हे प्रकार बंद करावेत, अन्यथा कडक कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, याची नोंद घ्यावी, असेही सुनील तटकरे यांनी म्हटले.

Action Against Fake AI Videos of Ajit Pawar: Sunil Tatkare Warns Miscreants

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात