Sunetra Pawar : जबाबदारी स्वीकारताना मन भरून येतंय; दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Sunetra Pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sunetra Pawar  महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. पती आणि राज्याचे लाडके नेते अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे ओढवलेल्या दु:खाच्या सावटाखाली असतानाच, त्यांनी “दादांच्या विचारांचा वारसा आणि महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास पुढे नेणार,” असा दृढ निश्चय व्यक्त केला आहे. ही जबाबदारी स्वीकारताना त्यांचे मन भरून आले असून, त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहेत.Sunetra Pawar

नेमके काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?

सुनेत्रा पवार म्हणाल्या, आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना मन अत्यंत भावुक झाले आहे. आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना ‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने ही जबाबदारी स्वीकारत आहे.Sunetra Pawar



सुनेत्रा पवार म्हणाल्या, दादांच्या अकाली जाण्याने वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. मात्र त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची प्रामाणिक बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि लोकाभिमुखतेने काम करत राहीन, हा विश्वास मी आज या निमित्ताने देते.

या कठीण काळात महाराष्ट्रातील जनतेने दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठिंबा हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने आणि नव्या ऊर्जेने पुढे चालत राहीन. शेतकऱ्यांच्या हितासाठी, युवकांच्या संधींसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य असेल, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.

देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी तसेच देशाचे गृह व सहकारमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य शासन सदैव तत्पर राहील. तसेच, नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडू, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या.

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या साथीने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, सामाजिक समता, आर्थिक प्रगती आणि सर्वसमावेशक समृद्धी साधण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. जनतेच्या अपेक्षांना न्याय देणे, शासन-प्रशासन अधिक संवेदनशील व लोकाभिमुख बनवणे आणि राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणे, हाच माझा संकल्प आहे.

पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचे, सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करीन, हा शब्द देते, असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.

Heart Full of Emotions: Sunetra Pawar’s First Reaction After Taking Oath

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात