NAVRATRI UTSAV : गरबा मंडपासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची नवीन नियमावली ; वादाची ठिणगी पडणार ?

NAVRATRI UTSAV

विशेष प्रतिनिधी

पुणे : NAVRATRI UTSAV :  कधी ये नवरात्र उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण दिसत आहे. परंतु विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केलेल्या एका मागणीमुळे आता या उत्सवात वाद होण्याची चिन्ह दिसत आहेत. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने गरब्याच्या ठिकाणी बिगर हिंदूंना प्रवेश देऊ नये अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आता वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

कोणताही उत्सव हा धार्मिक उत्सव असण्याऐवजी सामाजिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. गणेश उत्सव , दुर्गा पुजा , दिवाळी , मोहरम, ईद यासारख्या सर्व उत्सवात सर्व जाती-धर्माचे लोक सहभागी होत असतात. विशेषत: गणेशोत्सव आणि दुर्गा पूजनात मोठ्या प्रमाणात इतर धर्मातील लोकही सहभागी होत असतात. नवरात्र उत्सवात मंडळाकडून ठीक ठिकाणी गरबा उत्सव अयोजित केले जातात. या गरब्याला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित असतात. परंतु सध्या विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी घेतलेल्या एका भूमिकेमुळे वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. गरबा उत्सव मंडळाच्या मंडपात वराहदेवतेचे फोटो लावून येणाऱ्या कडून पूजा करून प्रवेश द्यावा अशी मागणी त्यांच्याकडून केले जात आहे. तसेच बगर हिंदूंना गरबा उत्सव मंडपात प्रवेश देऊ नये त्या दृष्टीने आम्ही उपाययोजना करणार असल्याची तयारी विश्व हिंदू परिषदेने दर्शवली आहे.



नवरात्रात गरबा उत्सव मंडळात येणाऱ्या प्रत्येकाचे आधार कार्ड पाहून त्या व्यक्तीचा धर्म तपासूनच आत मध्ये प्रवेश द्यावा प्रवेश घेणाऱ्याच्या मस्तकावर टिळा लावण्यात यावा. तसेच देवी मातेचा पूजन करायला लावण्यात यावे. या विश्व हिंदू परिषदेच्या नेहमीच्या मागण्यांशिवाय यंदा विश्व हिंदू परिषदेने गरबा उत्सव मंडळाच्या मंडपात आयोजकांनी वराहदेवतेचा फोटो लावण्याची आणि त्या चे पूजन करायचे अपेक्षा ठेवली आहे. काही विदर्भी वराहापासून गिरणा करतात त्यामुळे वराहदेवतेचे चित्र पाहून ते गरबा उत्सव मंडळापासून दूर राहतील असा तर्क विश्व हिंदू परिषदेने दिला आहे.

वराहदेवता आणि विश्व हिंदू परिषद यांचा संबंध नाही परंतु मुस्लिम समाजात वराहला अपवित्र समजले जाते. वराहाल वंदन केल्यास आपला धर्म भ्रष्ट होतो असे त्यांचे समजूत आहे. जे लोक तिळा लावत नाहीत मूर्ती पूजा करत नाहीत देवीला मानत नाहीत अशा लोकांचे गरब्याच्या स्थळी काय काम आहे. अशा अधर्मी लोकांना उद्यापासून दूर ठेवणे उचित आहे. असे लोक विनाकारण अडचणी निर्माण करतात त्यामुळे त्यांना गरब्याच्या स्थळी प्रवेश देण्यात येऊ नये असे विश्व हिंदू परिषदेने सांगितले आहे.

बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने घातलेल्या अटीचे पालन करून घेण्यासाठी या संघटना मंडळांची संपर्क साधणार आहेत. तसेच गरबा मंडपात जाऊन स्थितीवर ते नियंत्रण ठेवणार आहेत आणि असामाजिक तत्त्वांवर आणि विधर्मी लोकांवर नजर ठेवतील मंडळामध्ये काही गडबड आढळल्यास तेच पोलिसांशी संपर्क साधतील. असे बजरंग दलाकडून सांगण्यात येत आहे.

बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने घेतलेल्या या निर्णयामुळे आता नवा राजकीयवाद निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. त्यांनी घेतलेल्या या निर्णयावर आता मंडळांची यादी समाजातील लोकांची काय प्रतिक्रिया येथे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

New regulations of Vishwa Hindu Parishad and Bajrang Dal for Garba Mandapa; Will it spark a controversy? NAVRATRI UTSAV

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात