Eknath Khadse : एकनाथ खडसे म्हणाले- मी आधीही आणीबाणीच्या विरोधात; राष्ट्रवादीमध्ये राहून मी संघाचे काम करतो!

Eknath Khadse

विशेष प्रतिनिधी

जळगाव : Eknath Khadse मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे आणि संघ काही भाजपमध्येच राहून काम करा असे सांगत नाही. त्यामुळे मी संघातही आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून समाजसेवा करतो आहे. माझी मते आधीही आणीबाणीच्या विरोधात होती आणि आताही विरोधातच आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.Eknath Khadse

आणीबाणीच्या निर्णयाला ५० वर्षे झाल्याच्या पार्श्वभूमीवर मिसा कायद्यान्वये तुरुंगवास भोगलेल्यांच्या सत्काराचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला खडसे उपस्थित राहाणार आहेत, असे सांगण्यात आले होते. मात्र, ते कार्यक्रम संपल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात आले. दीपनगरच्या विद्युत निर्मिती केंद्रामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करायला आपण आलो आहोत, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. त्याच वेळी आपण आणीबाणीचे आजही विरोधकच आहोत, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.



पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले की, मी पूर्वीपासून संघाचा स्वयंसेवक आहे. तरीही मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. कारण संघ काही भाजपमध्येच राहून काम करा असे सांगत नाही. मी ४० वर्षे भाजपमध्ये काम केले आहे. त्यामुळे माझे विचार हिंदुत्ववादी आहेत. पण आता भाजपला बाॅम्बस्फोटातील आरोपींसोबत नाचणारे प्रिय झाले आहेत. अशा लोकांसोबत राहाण्याची माझी इच्छा नाही, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी स्पष्ट केले.

खडसेंच्या तक्रारीची दखल

दीपनगर येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राखेमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या विरोधात एकनाथ खडसे यांनी थेट केंद्र सरकारकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची केंद्राने गांभीर्याने दखल घेतली असून चौकशीसाठी समिती नेमण्याचे निर्देश जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याआधी तक्रारदाराशी प्रत्यक्ष चर्चा करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले होते. त्याअनुषंगाने एकनाथ खडसे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते, असे त्यांनीच माध्यमांना सांगितले.

Eknath Khadse: Opposes Emergency, Works for RSS in NCP

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात