Thank God सध्याच्या आव्हानात्मक काळात नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आहेत; उद्योगपती बाबा कल्याणी असं का म्हणाले??

Baba Kalyani

विशेष प्रतिनिधी

पुणे : Thank God सध्याच्या या अडचणी आणि आव्हानांनी भरलेल्या काळात नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आहे, असे उद्गार उद्योगपती बाबा कल्याणी यांनी काढले. त्यांच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. बाबा कल्याणींच्या वक्तव्यातून अनेकांनी वेगवेगळे अर्थ काढले. त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योगपतींशी आणि समाजाच्या वेगवेगळ्या घटकांशी संवाद साधतात. त्यावेळी ते विज्ञान तंत्रज्ञान, स्ट्रॅटेजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे मुद्द्यांवर बोलतात. आपण पंतप्रधान मोदींशी अनेकदा संवाद साधलात. आपला काय अनुभव होता??, असा सवाल मुलाखतकर्तीने बाबा कल्याणींना विचारला.



त्यावेळी बाबा कल्याणी उत्स्फूर्तपणे उद्गारले, Thank God सध्याच्या अडचणीच्या आणि आव्हानाच्या काळात नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान भारताला लाभलेत. त्यांच्या ऐवजी दुसऱ्या कुणा व्यक्तीचा पंतप्रधान म्हणून मी विचारही करू शकत नाही. पंतप्रधान मोदींची परिस्थितीची जाणीव आणि जानकारी अफलातून आहे. जागतिक राजकारणामध्ये आपल्या देशाच्या भोवती नेमके कुठे काय घडते आहे, हे त्यांना उत्तम समजते. त्यानुसारच ते स्वतःची स्ट्रॅटेजी ठरवून वाटचाल करतात. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत ते सर्वोत्तम पंतप्रधान आहेत!!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीत संरक्षण क्षेत्राची वाढ करण्याकडे सरकारने विशेषत्वाने लक्ष दिले. एकेकाळी सर्व संरक्षण सामग्री आयात करणाऱ्या भारताची संरक्षण सामग्रीची निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढली. भारतीय कंपन्यांच्या संशोधन आणि उत्पादन क्षमतेची प्रचिती सगळ्या जगाला आली. या पार्श्वभूमीवर बाबा कल्याणी यांनी वर उल्लेख केलेले उद्गार काढले. त्यांना विशेष महत्त्व आले.

Baba Kalyani shares his thoughts on India’s path ahead and how PM Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात