Sharad Pawar : उलटा चोर कोतवालावर उलटला; पण बांगलादेशाचा हिंसक राज्यकर्ता मोहम्मद युनूस विषयी पवारांना कळवळा; पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्ष हल्ला!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात अचानक शरद पवारांना बांगलादेशच्या नोबेल पारितोषिक विजेता अर्थतज्ञ हिंसक राज्यकर्ता मोहम्मद युनूस याच्या विषयी कळवळा आला. त्या कळवळ्यातूनच पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष हल्ला चढाविला. Sharad Pawar

शेख हसीनांची लोकशाही राजवट उलथून मोहम्मद युनूस बांगलादेशात सत्तेवर आला. त्याच्याच कारकिर्दीत बांगलादेशात शेकडो हिंदूंची हत्या झाली‌. सत्तेवर आल्याबरोबर मोहम्मद युनूसने बांगलादेशातल्या लोकशाहीवादी राजकीय पक्षांच्या नाड्या आवळल्या. 2026 च्या एप्रिलमध्ये निवडणुका जाहीर केल्या, तरी प्रत्यक्षात पुढची पाच वर्षे सत्तेची खुर्ची सोडायची नाही, याची तयारी चालवली. स्वतःच्याच जुन्या आर्थिक घोटाळ्यांवर पांघरूण घातले. भारताने केलेले उपकार विसरून चीनची चुंबाचुंबी सुरू केली. पण मोहम्मद युनूस याच्या या सगळ्या कारवाया विसरून शरद पवारांना त्याचाच कळवळा आला. त्याच्याशी आपले कसे घनिष्ठ संबंध आहेत, याचे पवारांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात तेल तूप लावून वर्णन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या शेजारच्या राष्ट्रांची सुसंवाद ठेवला नसल्याचा ठपका पवारांनी त्यांच्यावर ठेवला. उलटा चोर कोतवालावर उलटला. Sharad Pawar

शरद पवार म्हणाले :

भारताचे आज सर्व शेजाऱ्यांशी वाकडे झाले आहे. देशाच्या नेतृत्त्वाने शेजारच्या देशांशी सुसंवादाची स्थिती ठेवली नाही.

आज भारताचे पाकिस्तान, चीन, बांग्लादेश सोबत चांगले संबंध नाहीत. बांग्लादेशसाठी भारताने त्याग केला, तो बांगलादेश देखील आपल्यासोबत नाही. तिथल्या सध्याच्या राज्यकर्त्यांशी (मोहम्मद युनूस) माझे वैयक्तिक चांगले संबंध होते आणि आहेत. ते माझ्याबरोबर इथे पुण्यालाही येऊन गेले. पण आज देशाच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याशी सुसंवाद ठेवला नाही‌.*

राष्ट्रवादीला (NCP) जनतेचा पाठिंबा मिळाला, 26 वर्षांपूर्वी आपण एकत्र येऊन पक्ष स्थापन केला. 26 वर्षे लोकांनी सेवेची संधी दिली, अनेकांना पक्षाने संधी दिली. कार्यकर्त्यांमुळे आज हा दिवस साजरा करण्याची संधी मिळत आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या देशातली आणि जगातली परिस्थिती बदलली. आज आमचे पाकिस्तान, चीन, बांग्लादेश सोबत चांगले संबंध नाहीत. बांग्लादेशसाठी भारताने त्याग केला, तो बांग्लादेश देखील आपल्यासोबत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेससाठी आर.आर. पाटलांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून कष्ट केले. आबा सामान्य कुटुंबातील होते. सामान्य माणसाला संधी मिळाली की तो कर्तृत्व दाखवू शकतो, ते महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी काम करत राहिले. पक्ष सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे पुढे आला आहे. जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याचं काम पक्षाने केलं. पक्षाला मिळालेली प्रतिष्ठा कार्यकर्त्यांच्या कामामुळेच आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांनी संधी देणार असून संधी दिली तर महिला कर्तृत्व दाखवतात. येणाऱ्या निवडणुकीत 50 %महिलांना निवडून द्या, 2-3 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील. ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्यातील महिलांनी केलेल्या कामगिरीचा देशाला अभिमान आहे. राष्ट्रहितात मी कधीच राजकारण आणत नाही. देशहितासाठी नेहमीच ठाम भूमिका घेतली



भारताचं सर्वच शेजाऱ्यांशी वाकडं

चीनचा वाढता प्रभाव हा चिंतेचा विषय आहे. देशात एक काळ असा होता की, जवाहरलाल नेहरु यांचं नेतृत्व आणि भारत हा सगळ्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी ओळखला जायचा. आज आमचे पाकिस्तान, चीन, बांग्लादेश सोबत चांगले संबंध नाहीत. बांग्लादेशसाठी भारताने त्याग केला, तो बांग्लादेश देखील आपल्यासोबत नाही. देशाच नेतृत्व करणाऱ्यांनी सुंसवादाची परिस्थिती जाणीपूर्वक निर्माण केलेली नाही, त्याचा परिणाम देश भोगतोय. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि डावे पक्ष असतील किंवा इतर पक्ष एकत्र येऊन दिल्लीत सुसंवाद निर्माण केला पाहिजे. कोणी आले आणि गेले तरी फरक पडत नाही, आपण एकसंघ राहिलो तर सत्ता येते हा अनुभव आहे.

जयंत पाटलांच्या मागणीवर निर्णय घेऊ

– राष्ट्रवादीत फूट पडेल असं कधी वाटलं नव्हतं, कोण पक्षातून गेलं याची चिंता करू नका. सन 1980 नंतर आमची संख्या 6 वरून 72 झाली. जयंत पाटलांनी 10 वर्षे अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं, विरोधी बाकावरही आपण प्रामाणिकपणे काम केलं. सत्ता येते जाते, पण पुन्हा सत्तेत येणार हा विश्वास असल्याचे पवारांनी म्हटले. जयंत पाटलांनी पक्षाचं काम प्रामाणिकपणे केलं. जयंत पाटील म्हणाले नवीन चेहऱ्यांना संधी द्या, जयंत पाटलांच्या मागणीवर प्रमुख सहकाऱ्यांशी बोलून निर्णय घेणार आहे. प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यात नवी फळी तयार करू.

Sharad Pawar praise Mohammed Younus, but targets Narendra Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात