Amanatullah Khan : आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्ला खान यांच्याविरुद्ध FIR दाखल!

Amanatullah Khan

आचारसंहिता उल्लंघनाचा आरोप, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: Amanatullah Khan  दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाचे (आप) आमदार अमानतुल्ला खान यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणुकीसाठी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. मतदान सुरू होण्याच्या काही तास आधी हा गुन्हा दाखल करण्यात आला.Amanatullah Khan

अमानतुल्ला खान हे ओखला विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा बाटला हाऊस परिसरात निवडणूक प्रचार साहित्य वाटप करताना अमानतुल्ला खान एका व्हिडिओमध्ये दिसला होता.



या संदर्भात त्याच्याविरुद्ध जामिया नगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. सूत्रांनी सांगितले की, “व्हिडिओ आणि प्राथमिक तपासाच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला आहे; या प्रकरणात तपास सुरू आहे.” दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी संध्याकाळी संपला. अन्सार इम्रान नावाच्या व्यक्तीने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘आप’ उमेदवार अमानतुल्ला खान यांच्या समर्थनार्थ प्रचार करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता.

‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असे लिहिले होते की, “निवडणूक प्रचार संपल्यानंतरही, आप समर्थक ओखलामध्ये फिरत आहेत आणि कलम १४४ आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत! आप उमेदवार अमानतुल्ला खान यांची टीम उघडपणे निवडणूक नियमांचे उल्लंघन करत आहे.” हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल आप उमेदवाराविरुद्ध एफआयआर दाखल केला. डीसीपी दक्षिण पूर्व दिल्ली यांनी त्यांच्या ‘एक्स’ हँडलवरून पोस्ट करून ही माहिती दिली.

FIR filed against Aam Aadmi Party MLA Amanatullah Khan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात