विशेष प्रतिनिधी
नागपूर : Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी शपथविधी सोहळा झाला. अनेक नव्या मंत्र्यांचा समावेश केल्याने मंत्रिमंडळाचा चेहरा मोहरा बदलला. आता येत्या दोन दिवसांत मंत्र्यांचे खातेवाटप करून त्याच्या कारभाराला गती देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. Devendra Fadnavis
खातेवाटपावर अंतिम हात फिरवला आहे. तिघांचेही त्यावर एकमत झाले आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आणि तीन विधेयकांवर चर्चा हा हिवाळी अधिवेशनाचा अजेंडा आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार याची परंपरा पाळली, असा टोला अजित पवारांनी विरोधकांना लगावला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या नाराजीची चर्चा पूर्णपणे फेटाळून लावली. Devendra Fadnavis
मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 39 मंत्र्यांनी आज शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपाचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 33 जणांनी कॅबिनेट तर 6 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपाच्या 3, शिवसेनेच्या 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याला राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे. Devendra Fadnavis
शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांची संपूर्ण यादी
1) चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा 2) राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा 3) हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस 4) चंद्रकांत पाटील, भाजपा 5) गिरीश महाजन, भाजपा 6) गुलाबराव पाटील, शिवसेना 7) गणेश नाईक, भाजपा 8) दादा भुसे, शिवसेना 9) संजय राठोड, शिवसेना 10) धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस 11) मंगलप्रभात लोढा, भाजपा 12) उदय सामंत, शिवसेना 13) जयकुमार रावल, भाजपा 14) पंकजा मुंडे, भाजपा 15) अतुल सावे, भाजपा 16) अशोक उईके, भाजपा 17) शंभूराज देसाई, शिवसेना 18) आशिष शेलार, भाजपा 19) दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस 20) आदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस 21) शिवेंद्रराजे भोसले, भाजपा 22) माणिकराव कोकाटे, भाजपा 23) जयकुमार गोरे, भाजपा 24) नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी काँग्रेस 25) संजय सावकारे, भाजपा, 26) संजय शिरसाट – शिवसेना 27) प्रताप सरनाईक, शिवसेना 28) भरत गोगावले, शिवसेना 29) मकरंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस 30) नितेश राणे, भाजपा 31) आकाश फुंडकर, भाजपा 32) बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस 33) प्रकाश आबिटकर, शिवसेना 34) माधुरी मिसाळ, भाजपा (राज्यमंत्री) 35) आशिष जैस्वाल, शिवसेना (राज्यमंत्री) 36) पंकज भोयर, भाजपा (राज्यमंत्री) 37) मेघना बोर्डीकर, भाजपा (राज्यमंत्री) 38) इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस (राज्यमंत्री) 39) योगेश कदम, शिवसेना (राज्यमंत्री)
आता मंत्र्यांच्या खातेवाटपाची प्रतीक्षा आहे. ते रात्री उशिरापर्यंत होण्याची शक्यता होती, पण ते दोन दिवसांत करून गतिमान कारभार सुरु करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App