विशेष प्रतिनिधी
मुंबई : महायुतीतल्या मित्र पक्षांच्या वाटाघाटी अजून सुरू असताना सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी एक सोशल मीडिया पोस्ट करून एकनाथ शिंदे यांना थेट विरोधी पक्षनेते पदावर बसविले. पण यातून त्यांनी महायुतीला की महाविकास आघाडीला टोला हाणला??, असा सवाल तयार झाला.
एकनाथ शिंदे जाहीर रित्या मोदी शहा यांनी घेतलेला निर्णय मान्य करतात पण नंतर ते आजारी पडतात हे नेमके काय चालले आहे असा सवाल करून अंजली दमानिया यांनी भाजपच्या नेत्याचा हवाला देऊन एकनाथ शिंदेंना विरोधी पक्षनेते कधी बसवायची तयारी चालवल्याचे त्या पोस्टमध्ये नमूद केले. त्यामुळे सरकारी आपलेच आणि विरोधी पक्षनेताही आपलाच बाकी सगळे साफ!!, ही भाजपची रणनीती असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला.
Sadabhau Khot सदाभाऊ खोतांचा बाबा आढावांना सवाल- मुस्लिमबहुल भागात महायुतीला कमी मते मिळतात, तिथे EVM मविआसाठीच कसे सेट होते?
एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? परवाच संध्याकाळी, आमच्या काही कार्यकर्त्यांना मी एक पत्रकार भाऊंशी झालेला संवाद संगात होते. ४ दिवसांपूर्वी PC घेऊन भाजप ला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले, मग ताप काय आला, मग घरी काय आले, दाल मे कूछ काला है. ते पत्रकार मला म्हणाले की भाजप… — Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 2, 2024
एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते?
परवाच संध्याकाळी, आमच्या काही कार्यकर्त्यांना मी एक पत्रकार भाऊंशी झालेला संवाद संगात होते.
४ दिवसांपूर्वी PC घेऊन भाजप ला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले, मग ताप काय आला, मग घरी काय आले,
दाल मे कूछ काला है.
ते पत्रकार मला म्हणाले की भाजप…
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 2, 2024
पण हे सगळे घडत असताना महाविकास आघाडीचे नेते नेमके काय करतील??, याचा खुलासा अंजली दमानिया यांनी केला नाही. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांना विरोधी पक्षनेते पदावर बसविणे इतके सहज आणि सोपे आहे का??, 57 आमदार निवडून आणून एकनाथ शिंदे इतक्या सहजासहजी विरोधी पक्षनेते पदावर जाऊन बसतील का??, त्यातून फक्त महाविकास आघाडी साफ होण्यापलीकडे भाजपला दुसरा कोणता फायदा तरी होईल का??, या संदर्भात देखील त्यांनी कुठले भाष्य केले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App