वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी त्यांच्या व्होट जिहादच्या वक्तव्यावरून जाहीर माफी मागितली. या संदर्भात नोमानी यांनी माफीनामा जाहीर केला होता. सज्जाद नोमानी यांच्या माफीनाम्यावरून किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. व्होट जिहादवरून उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी कधी माफी मागणार? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.
मौलाना सज्जाद नोमानीचा माफीनामा ‘मैने भाजपा का समर्थन करनेवाले मुसलमानों का सामाजिक बहिष्कार करने, वोट जिहाद के लिये कहा था. मेरे ऐसे कहने से किसीकी भावनाए आहत हुई है तो मैं अपने शब्द वापस लेता हु और बिना शर्त माफी मांगता हूं" मौलाना सज्जाद नोमानीने ऐसे पत्र प्रसिध्द केले आहे pic.twitter.com/hlw4qZEmNq — Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 26, 2024
मौलाना सज्जाद नोमानीचा माफीनामा
‘मैने भाजपा का समर्थन करनेवाले मुसलमानों का सामाजिक बहिष्कार करने, वोट जिहाद के लिये कहा था. मेरे ऐसे कहने से किसीकी भावनाए आहत हुई है तो मैं अपने शब्द वापस लेता हु और बिना शर्त माफी मांगता हूं"
मौलाना सज्जाद नोमानीने ऐसे पत्र प्रसिध्द केले आहे pic.twitter.com/hlw4qZEmNq
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 26, 2024
किरीट सोमय्या म्हणाले, व्होट जिहादचा फतवा काढणारे मौलाना सज्जाद नोमानी यांनी आता माफी मागितली आहे. मी भाजपला मतदान करणाऱ्या मुस्लिमांचा बहिष्कार करण्यास सांगितले होते. व्होट जिहाद करण्यास सांगितले होते. माझ्या अशा बोलण्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मी माझे शब्द मागे घेतो आणि विनाअट माफी मागतो, अशा शब्दांत मौलानांनी माफी मागितली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी व्होटजिहादसाठी केव्हा माफी मागणार? असा सवाल सोमय्या यांनी विचारला आहे.
विधानसभा निवडणुकीत गाजला व्होट जिहादचा मुद्दा
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्होट जिहादचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी मुस्लिमांना व्होट जिहाद करण्याचे आवाहन केले होते. याबाबतचा त्यांचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्यानंतर भाजपकडून ‘एक है तो सेफ है’, ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देत मतांचे धर्मयुद्ध करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
लोकसभेतही फटका बसल्याचा भाजपचा दावा
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत व्होट जिहादमुळे भाजपला नुकसान झाल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे. अनेक मतदारसंघांमध्ये अल्पसंख्यांकांची एक गठ्ठा मते विरोधी पक्षाला मिळाल्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App