Samajwadi Party : काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने हिंसाचार भडकावला ; ‘विहिंप’चा आरोप!

Samajwadi Party

एनएसएने सर्व दोषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली गेली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Samajwadi Party उत्तर प्रदेशातील संभल येथे झालेल्या हिंसाचारावर विश्व हिंदू परिषदेने सोमवारी प्रतिक्रिया दिली. परिषदेने हिंसाचाराचा निषेध केला आणि सपा आणि काँग्रेसच्या नेत्यांनी हिंसाचार भडकावल्याचा आरोप केला. हिंसाचारात सहभागी असलेल्या सर्वांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही केली आहे.Samajwadi Party

विहिंपचे संयुक्त सरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी दोषी आणि त्यांच्या समर्थकांवर NSAअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आणि हिंसाचारामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दंगलखोरांनी केली पाहिजे, अशी मागणी केली आहे.



 

ते पुढे म्हणाले, “संभलमध्ये ज्या प्रकारे मुस्लीम कट्टरपंथीयांनी दगडफेक केली, गोळीबार केला आणि पोलिसांवर जाळपोळ केली… ते अत्यंत निषेधार्ह आहे. ज्या प्रकारे मुस्लिम नेते, मौलाना आणि काँग्रेसचे अनेक नेते, राहुल गांधी आणि समाजवादी पक्ष, या हिंसेचे समर्थन करण्यात आले आहे, हेही चिंताजनक आहे.

मौलानांच्या सांगण्यावरून हा हिंसाचार झाल्याचा आरोप सुरेंद्र जैन यांनी केला. त्यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांवर प्रक्षोभक विधाने केल्याचा आरोप केला आणि ते म्हणाले, “दंगलखोर आणि त्यांच्या समर्थकांवर एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे. सर्वांना ताबडतोब अटक करण्यात यावी. त्यांच्याकडून सर्व नुकसान भरपाई मिळावी.”

संभलमध्ये मुघलकालीन मशिदीतील सर्वेक्षणाविरोधात रविवारी आंदोलक आणि पोलिसांमध्ये हिंसक चकमक झाली. 20 पोलीस आणि इतर चार सरकारी कर्मचारी जखमी झाले. या हिंसाचारात आतापर्यंत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. संभल पोलिसांनी हिंसाचारप्रकरणी सात एफआयआर दाखल केले आहेत.

Congress and Samajwadi Party incited violence VHP alleges

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात