विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी ताज लँड हॉटेलमध्ये बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना शिंदे गटाच्या निवडून आलेल्या सर्व आमदारांनी एकमताने ठराव पास करून एकनाथ शिंदे यांनी गटनेतेपदी निवड केली आहे.
तसेच, या बैठकीमध्ये चार ठराव मांडण्यात आले. एकनाथ शिंदे यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचेही अभिनंदन करण्यात आले. सोबतच एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवडही करण्यात आली.
Nana Patole विधानसभेतील पराभवावर चिंतन करू, जनतेच्या प्रश्नांसाठी यापुढेही काम करू, नाना पटोलेंची प्रतिक्रिया
लाडक्या बहिणींनी सावत्र भावाचा कार्यक्रम केला – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे म्हणाले – लाडक्या बहिणींना आपण कायम सावत्र, कपटी आणि दुष्ट भाऊ कोण हे सांगत राहिलो. त्यामुळे त्यांनी त्यांचा कार्यक्रम करून टाकला. हा फार मोठा विजय आहे. विरोधकच शिल्लक ठेवले नाहीत. एवढा मोठा विजय हा केवळ लाडक्या बहिणींमुळे मिळाला. तसेच, काही सहकारी हेदेखील हजार ते बाराशे मतांनीच पडलेले आहेत. जनतेने आपल्याला आशीर्वाद दिला असून आपल्याला त्याच उत्साहाने काम करायचे आहे. निवडून आलेल्या सर्व आमदारांचे स्वागतही एकनाथ शिंदे यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, आता आपण दिवसेंदिवस असेच लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवत जाणार आहोत. मी माझ्या लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पाळणार असून लवकरच त्यांच्या खात्यात एकवीसशे रुपये पडणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलतांना दिले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी निवडून आलेल्या सर्व आमदारांचे स्वागत केले. आणि त्यांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांनी जोमाने कामाला लागायचे असल्याचेही सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App