वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 65.02% मतदान झाले. गडचिरोलीत सर्वाधिक 69.63% व मुंबई सिटीत सर्वात कमी 49.07% मतदान झाले. आता येत्या शनिवारी म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन राज्याचा कारभारी कोण होणार? हे स्पष्ट होईल.65% voting for 288 seats in Maharashtra
बीड विधानसभा मतदारसंघात आज अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावर हार्ट अटॅकने मृत्यू झाला. तर धुळ्यातील एका पोलिंग बुथवर भाजप व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली.
दुसरीकडे, काँग्रेस नेते श्रीनिवास बी व्ही यांनी शिर्डी मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर करत धुळ्याच्या एका तरुणीने शिर्डीत मतदान केल्याचा दावा केला आहे.
सुरुवातीला अनेक ठिकाणी EVM मध्ये बिघाड, मतदानाला विलंब
मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील बुथ क्रमांक 292 येथे सकाळी 8.30 च्या सुमारास ईव्हीएम मशीन बंद पडली. ईव्हीएम मशीनमध्ये इनव्हॅलिड (अवैध) मते दिसून येत होती. नाशिकच्या पंचवटी भागातील अनेक मतदान केंद्रांवरही तांत्रिक बिघाडामुळे 20 मिनिटे मतदान खोळंबले होते.
मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील संत कबीर प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रातील ईव्हीएममध्येही बिघाड झाला होता. याठिकाणी तासाभराने मतदान प्रक्रिया सुरू झाली. उत्तर नागपूर संसदीय क्षेत्रातील कस्तुरबा नगर भागातील एक ईव्हीएमही नादुरुस्त झाले होते.
बखर लाईव्हच्या वृत्ताची दखल, क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यावर भाजप राष्ट्रीय प्रवक्त्यांचे पाच प्रश्न
बिटकॉइन स्कॅमवर आरोप – प्रत्यारोप
निवडणूक सुरू असताना भाजप नेते संबित पात्रा यांनी बिटकॉईन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सुप्रिया सुळे व नाना पटोले यांचे नाव घेत या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली. भाजपने या दोघांवरही निवडणुकीत बिटकॉईनच्या माध्यमातून परकीय चलनाचा वापर केल्याचा आरोप केला आहे. सुप्रिया सुळे व शरद पवार यांनी हे आरोप फेटाळले. शरद पवार म्हणाले की, हे आरोप करणारा माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील तुरुंगातून आलेत. विनोद तावडे प्रकरणामुळे भाजप परेशान असून, ते आमच्यावर खोटे आरोप लावत आहेत.
विनोद तावडे यांच्या ‘नोट फोर व्होट’वरही वादविवाद
बहुजन विकास आघाडीचे (BVA) नेते हितेंद्र ठाकूर यांनी भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नोट फोर व्होटचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, विनोद तावडे यांनी संपूर्ण हॉटेल बूक का केले होते. आता तावडे आपणच या हॉटेलचे मालक असल्याचा दावा करत आहेत. बिनधोकपणे खोटे बोलणे हे त्यांचे धोरण बनले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या प्रकरणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर विनोद तावडे यांनी राहुल गांधींकडे आपल्याकडे 5 कोटी असल्याचे पुरावे देण्याचे आव्हान दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुटुंबासह मतदान केले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह ठाण्यात मतदान केले. ते म्हणाले- या निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ताधारी महायुतीला बहुमत मिळेल. लोकशाहीचा हा उत्सव महाराष्ट्राला चांगल्या भविष्याकडे घेऊन जाईल. सशक्त महाराष्ट्र घडवण्याची ही संधी आहे. आमचे अडीच वर्षांचे काम लोकांनी पाहिले आहे. आम्ही केलेली कामे आणि आम्ही केलेला विकास त्यांनी पाहिला आहे. त्यामुळे जनता आम्हालाच विकासासाठी मतदान करेल.
शिर्डीत बोगस मतदान झाल्याचा आरोप
काँग्रेस नेते श्रीनिवास बी व्ही यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शिर्डीत बोगस मतदान झाल्याचा आरोप केला. त्यांनी यासंबंधी एका तरुणीचा व्हिडिओ शेअर केला. त्यात ही तरुणी आपण धुळ्याचे असून, शिर्डीत मतदान केल्याचे सांगताना दिसून येत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे शिर्डी धुळ्यापासून 300 किमी अंतरावर आहे.
बीडमध्ये अपक्ष आमदाराचा हार्ट अटॅकने मृत्यू
बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचे मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते शहरातील छत्रपती शाहू विद्यालयातील मतदान केंद्रावर थांबले होते. तिथे त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App